आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

18 तासाच्या प्रवासासाठी निघालेलं हे विमान चक्क 43वर्ष आकाशातच फिरत राहिले होत…


आपण यापूर्वी अनेक वैज्ञानिक चमत्कारांबद्दल ऐकले असेल, परंतु आज आम्ही तुम्हाला एका  अशी गोष्ट सांगणार आहोत जी वाचून तुम्हालाही आच्छर्य वाटेल. एक विमान साधारणतः देशांतर्गत प्रवास एक ते दोन दिवसात पूर्ण करते. परंतु अशीही एक  घटना होऊन गेली आहे ज्यात एका दिवसाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी उडालेले विमान अनेक वर्ष उलटूनही परत आले नव्हते.

हो ही विचित्र घटना साक्षात घडली आहे. विमानतळावरून उडालेल हे विमान आपल्या नियोजित जागी दुसऱ्या दिवशी पोहोचणे अपेक्षित होते परंतु अनेक वर्ष उलटूनही ते तिथे पोहचले नव्हते.


सेंटियागो फ्लाइट 513 रहस्यमई ढंग से गायब 35 साल बाद लैंडिंग santiago airlines flight 513 disappeared ,thenewscode - THE NEWS CODEब्राझीलच्या विमानचालन अधिकाऱ्यांच्या मते, सँटियागो 513 हे व्यावसायिक विमान 4 सप्टेंबर 1954 रोजी जर्मनीहून उड्डाण केले आणि अटलांटिक महासागरावर कुठेतरी गायब झाले. असे मानले जात होते की हे विमान कोसळले आणि त्यातील सर्व प्रवासी ठार झाले.

new google

हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


पण आच्छर्यकारक गोष्ट म्हणजे ते विमान 1989 मध्ये ब्राझीलच्या भूमीवर उतरले .ज्यात 92 प्रवाशांसह पायलट आणि हवाई सुंदरीचे सांगाडे सापडले होते. सर्व मृत प्रवाशांचे सांगाडे घेऊन हे विमान अचानक विमानतळावर कसे आले? आणि  जवळपास 43 वर्ष गायब असलेले हे विमान होते तरी कुठे या प्रश्नांची उत्तर मात्र कोणाकडेही नव्हती.

विश्वास न बसण्यासारखी ही गोष्ट काही वर्षांपासून इंटरनेटवर विविध वेब-स्रोतांद्वारे पसरली आहे.

खरं तर ही विलक्षण कथा पहिल्यांदा 14 नोव्हेंबर 1989 च्या साप्ताहिक वर्ल्ड न्यूज टॅब्लॉइडच्या आवृत्तीत हलक्या-पात्र बातम्या म्हणून प्रकाशित झाली. जेथे वृत्तपत्राचा संवाददाता इरविन फिशर अहवाल या उड्डाणाच्या आसपासच्या स्केची तपशीलांची पुष्टी करतो.

बेपत्ता उड्डाणाच्या पुन्हा दिसण्यावर अधिकार्‍यांनी काहीही बोलण्यास नकार दिला किंवा 35 वर्षांपासून विमान कोठे आहे याचा अंदाज सुद्धा लावला गेला नाही. आणखी महत्वाच म्हणजे एका मृत पायलटच्या सांगाड्याने हे विमान विमानतळावर कसे उतरवले? कारण जेव्हा विमानात अधिकारी गेले तेव्हा पायलटच्या सीटवर फक्त पायलटचा सांगाडा होता.

विमान

सरकारी एजंटांनी विचित्र घटनेची विस्तृत तपासणी केली होती तरीही त्यांनी विमान आणि त्यांच्या तपासाबद्दल काहीही चर्चा करण्यास नकार दिला. त्यांनी डॉ. अॅटेलोच्या शब्दावरही टिप्पणी करण्यास नकार दिला की विमान अकाली दाखल कसे झाले? या बाबतीत विमानतळ अधिकाऱ्यानीही काहीही बोलण्यास नकार दिला होता.

या घटनेमागे आत्मा, भूत प्रेत यांचाही हात असल्याच्या बातम्या आल्या होत्या.  वैमानिकांनी आणि प्रवाशांनी चमत्कारिकरित्या आपला जीव गमावल्याच्या असंख्य बातम्या आल्या पण खरच विमानातील लोकांसोबत नक्की काय झालं होत हे कोणालाही आजून कळू शकल नाहीये.

जर ही बातमी फक्त फसवणूक नव्हती आणि ती एखाद्या वास्तविक घटनेवर किंवा तत्सम गोष्टीवर आधारित होती तर इतर घटनांनंतर प्रश्न उद्भवतो की त्या कथित बेपत्ता फ्लाइट 513 चे खरोखर काय झाले? हा प्रश्न मात्र आजूनही निरुत्तरित आहे..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

 

 

 

 

 

नवनवीन लेख आणि व्हिडीओ पाहण्यासाठी सब्सक्राईब करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here