आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आयपीएलच्या इतिहासात गेल्या 14वर्षात कोणीही न करू शकलेला हा विक्रम मोहमम्द नबीने करून दाखवलाय…


क्रिकेट जगतातील सर्वात उच्च टी 20 क्रिकेट लीगपैकी एक इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा संघ कोणत्याही स्वरूपात चांगली कामगिरी करतांना दिसला नाही. सन 2016 मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा संघ या संपूर्ण हंगामात मागे राहिला आणि 14 पैकी फक्त 3 सामने जिंकू शकला.

सनरायझर्स हैदराबादच्या या खेळाडूने केली उत्तम कामगिरी 

सनरायझर्स हैदराबादच्या संघालाही त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सच्या हातून 42 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि यासह त्यांना या मोसमाला वाईट निरोप देण्यात आला. या संपूर्ण हंगामात ऑरेंज आर्मी लय शोधत होती.


हेही वाचा…

new google

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


आयपीएलच्या 14 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद काही चमत्कार दाखवू शकले नाही, पण त्याच्या संघातील एका खेळाडूने शेवटच्या सामन्यात मोठा विक्रम करून मोकळा झाला.

मोहम्मद नबीने आयपीएलच्या 14 वर्षांत इतिहास रचला.

मोहमम्द नबी

या हंगामात केवळ 3 सामने खेळण्याची संधी मिळालेल्या अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटू मोहम्मद नबीने शेवटच्या साखळी सामन्यात चमत्कार केले जे आयपीएलच्या 14 वर्षांच्या इतिहासात कोणीही करू शकले नाही. या सामन्यापूर्वी मोहम्मद नबीला या हंगामात फक्त 2 सामने खेळण्याची संधी मिळाली. अंतिम सामन्यात कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीमुळे नबीला संघात स्थान देण्यात आले जे त्याने चेंडू आणि फलंदाजीने नव्हे तर क्षेत्ररक्षणाने संस्मरणीय केले.

क्षेत्ररक्षणातील एका सामन्यात घेतलेले 5 झेल, आयपीएलमधील नवा विक्रम

मोहम्मद नबीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 5 झेल घेतले. त्याने मुंबईचे 5 फलंदाज रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जेम्स नीशम, कृणाल पंड्या आणि नॅथन कुल्टर-नाईलचे झेल घेतले. आयपीएलच्या इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा हा विक्रम ठरला.

जर यष्टीरक्षकाचाही या प्रकरणात समावेश असेल तर त्याने कुमार संगकाराच्या डेक्कन चार्जर्सच्या 2011 च्या 5 झेलच्या विक्रमाची बरोबरी केली परंतु क्षेत्ररक्षक म्हणून हा एका सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आहे.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here