आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

चेन्नईकडून झालेल्या पराभवामुळे दिल्लीकर पंत नाराज, या खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर…


इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) चा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK)सोबत दुबईमध्ये झाला जिथे CSK ने दिल्ली कॅपिटल्सचा 4 विकेटने पराभव केला. CSK कर्णधार एमएस धोनीने शेवटच्या षटकात फक्त 4 चेंडूंमध्ये आवश्यक 13 धावा केल्या.

चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सकडून 173 धावांचे लक्ष्य दोन चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. डावाच्या शेवटच्या षटकात CSK कर्णधार धोनीने एकापाठोपाठ एक तीन चौकार मारले आणि संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 70 आणि रॉबिन उथप्पाने CSK कडून 63 धावा केल्या. दिल्लीकडून टॉम करनने 3 विकेट घेतल्या. त्याचवेळ या हंगामात दिल्लीचा नायक असलेला आवेश खान आज त्याच्या लयीतून भटकताना दिसला. त्याने 4 षटकांत 47 धावा खर्च केल्या आणि त्याला फक्त एक विकेट घेता आली.

पंत

new google

दिल्लीला अजूनही संधी आहे.

या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 172 धावा केल्या. या सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार रीषभ पंतने अर्धशतकी खेळी केली. दिल्लीने चेन्नईच्या संघासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले. क्वालिफायर सामना गमावल्यानंतरही दिल्लीला अंतिम फेरी गाठण्याची अजून एक संधी आहे.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


पराभवामुळे कर्णधार पंत निराश .

सामना गमावल्याचे दुःख दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रीषभ पंतच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तो सामना समारंभात म्हणाला,“हा पराभव निश्चितच खूप निराशाजनक आहे आणि निराशेचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला वाटले की टॉमने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे त्यामुळे त्याला शेवटची षटके देणे योग्य ठरेल. आम्ही चांगली धावसंख्या मांडली होती. पुढील सामन्यात आम्ही आमच्या चुका सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करू जेणेकरून आम्ही अंतिम फेरी गाठू शकू.

दिल्लीला आता अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल तर आज होणाऱ्या कोलकत्ता आणि बंगलोर संघातील विजेत्या संघाबरोबर दोन हात करावे लागतील..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here