आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

मराठमोळ्या ऋतुराजने दाखवला मनाचा मोठेपणा.! स्वतः सामनावीर घोषित झाल्यावर सामनावीराचे श्रेय दिले या खेळाडूला…!


दुबईत खेळल्या गेलेल्या IPL 2021 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात, रीषभ पंतच्या काही चुकांमुळे दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची एक सोपी संधी वाया गेली. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने 2 चेंडू शिल्लक असताना संघाला 4 गडी राखून विजय मिळवून दिला.

प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईने दिल्लीला 20 षटकांत 171 धावांवर रोखण्यात यश मिळवले. लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेच्या संघाने सलामीवीर ऋतुराज गायकवाड (70), रॉबिन उथप्पा (63), मोईन अली (16) आणि शेवटी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 6 चेंडूत 18 धावांची खेळी खेळली.

ऋतुराज

new google

हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


या दरम्यान दिल्लीचा कर्णधार रीषभ पंतचा अननुभवीपणा दिसून आला. डेथ स्पेशालिस्ट कागिसो रबाडा षटक शिल्लक असूनही त्याने शेवटचा षटक टॉम कुरनकडून घेण्याचा निर्णय घेतला जो थोडासा दिल्लीला महागा पडला. धोनीने शेवटच्या षटकात 2 चेंडू बाकी असताना 13 धावा सहज पूर्ण केल्या.

तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला जाताना दिल्ली कॅपिटल्सच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन सात चेंडूत अवघ्या सात धावा करून बाद झाला. पण त्याचा साथीदार फलंदाज पृथ्वी शॉने अवघ्या 34 चेंडूत सर्वाधिक 60 धावा केल्या.

ऋतुराज

त्याच्या बॅटने सात चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचबरोबर कर्णधार रीषभ पंतने नाबाद 51 धावांची खेळी खेळली. याशिवाय शिमरॉन हेटमायरने 37 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी चेन्नईकडून जोश हेजलवूडने 29 धावांत दोन बळी घेतले. या सामन्यात चेन्नईसाठी संयमी खेळी खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ऋतुराज गायकवाड झाला उथप्पाचा चाहता!

सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने त्याच्या खेळीचे संपूर्ण श्रेय रॉबिन उथप्पाला दिले. तो म्हणाला,मी क्रीजवर शांत राहण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक सामना नवीन आहे म्हणून आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. या सामन्यात पॉवरप्ले खूप महत्वाचा होता चेंडू विकेटवर थोडा थांबून येत होता. रॉबिन चांगली फलंदाजी करतो. त्याच्यासमोर खेळल्याने माझ्यासाठी फलंदाजीही सोपी झाली. ज्यामुळे तो सामन्यात राहून संघासाठी कामगिरी करून परतला.

दिल्लीला हरवून चेन्नईने थेट अंतिम सामन्याच तिकीट पक्क केलंय. त्यांच्या सामना आता 15ऑक्टोबरला फायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या दुसऱ्या संघासोबत होईल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here