आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

“एक एक पेग प्या आणि महिलांना तणावमुक्त करा” कॉंग्रेसच्या या महिला मंत्र्याने पुरुषांना सल्ला दिलाय.


छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने निवडणुकीमध्ये दिलेले आपले आश्वासन पूर्ण करण्यासाठी राज्यात दारू बंदी लागू करण्याची तयारी करत आहे. याच दरम्यान आता छत्तीसगड सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या अनिला भेडिया यांनी पुरुषांनाएक अजबच सल्ला दिला आहे. ‘झोपायच्या आधी एक पेग घेत जा, जेणेकरून महिला तणावातून मुक्त होऊ शकतील’, असा अजब सल्ला भेडिया यांनी  दिला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


महिला घर आणि कुटुंबाची काळजी घेतात. त्यांना मानसिक तणाव जाणवतो. अशा परिस्थितीत पुरुष थोडी थोडी प्या आणि झोपा.’ आपल्या वक्तव्यावरून वाद वाढत असल्याचे पाहून त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे. त्या म्हणल्या, ‘मी दारूच्या आहारी गेलेल्या पुरुषांना संबोधित करत होते आणि मी त्यांना म्हणाली की कमी प्यायला हवी. घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना खूप मानसिक दबावाला सामोरे जावे लागते. मला म्हणायचे होते की दारूचे व्यसन वाईट आहे आणि प्रत्येकाने त्यापासून दूर राहायला हवं, अनिला भेडिया म्हणाल्या आहेत.

पेग

दरम्यान, त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंत्री अनिला भेडिया बुधवारी छत्तीसगड येथील सिंघोला गावात लोकांना संबोधित करत होत्या. कमर जमातीच्या महिलांशी बोलताना त्या त्यांना सांगत होत्या की, जेव्हापासून सरकारने गावकऱ्यांना स्वतःची दारू बनवण्याची परवानगी दिली आहे, तेव्हापासून गावात दारूच्या विक्रीत वाढ झाली आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here