आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

सचिनच्या जर्शीचा नंबर वापरल्यामुळे ट्रोल झालेल्या शार्दुल ठाकूरने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय….


क्रिकेट क्षेत्रात अशे अनेक तारे  आहेत ज्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर नाव कमावले. त्यांना मैदानावर खेळतांना पाहून चाह्त्यांचाही उत्साह शिगेला पोहचायचा. अश्या काही निवडक खेळाडूंपैकी एक तो म्हणजे भारतीय क्रिकेटर “शार्दुल ठाकूर” . शार्दुलचे चाहते त्याला प्रेमाने लॉर्ड शार्दुल म्हणतात.

आयपीएलच्या चेन्नई संघातील खेळाडू शार्दुल ठाकूरचा आज वाढदिवस. शार्दुलचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी पालघर येथे झाला. गेल्या एका वर्षात शार्दुलने टेस्ट, वनडे आणि टी20 सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात  ब्रिस्बेन टेस्ट आणि इंग्लंड विरोधात ओवल टेस्टमध्ये शार्दुलने भारताला विजय मिळवून विशेष योगदान दिले. आयपीएलमध्ये चेन्नई संघातील सर्वांत जास्त विकेट घेणारा खेळाडू शार्दुल ठरला आहे. शार्दुलने या आयपीएलच्या सिझनमधील 16 सामन्यामध्ये 21 विकेट घेतल्या आहेत.


हेही वाचा…

new google

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


अष्टपैलू खेळाडू असलेल्या शार्दुलने 2017 मध्ये श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यामध्ये भारताकडून डेब्यू केला होता. एक वर्षानंतर त्याला टी 20 संघामध्ये घेण्यात आले. 2018 मध्ये आयपीएल जिंकलेली टीम चेन्नईमध्ये शार्दुल होता. शार्दुलनं 2018 साली टेस्ट डेब्यू केला होता. पण नंतर पुन्हा संघात येण्यासाठी त्याला दोन वर्ष लागली.

शार्दुल ठाकूर
एका मुलाखतीमध्ये शार्दुलने सांगितले की, जेव्हा तो टेस्ट टीमच्या बाहेर होता तेव्हा त्याला महेंद्र सिंह धोनीमुळे  मदत मिळाली होती. शार्दुलने सांगितले, ‘जेव्हा धोनी त्यांचे अनुभव शेअर करत असतात. तेव्हा त्या अनुभवांमधून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ते असे व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडून नेहमी काही तरी नवं शिकायला मिळते. जर तुम्ही हुशार असाल तरच तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या गोष्टी समजतील.

आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने शार्दुलला टी20 वर्ल्ड कप संघामध्ये घेण्यात आले. आधी त्याची  रिझर्व्ह खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. मुंबई क्रिकेट सर्कलमध्ये शार्दुल ठाकूरला त्याच्या गोलंदाजीमुळे  ‘पालघर एक्सप्रेस’ असे म्हणले जाते.  रणजी ट्रॉफी 2014-15 मध्ये  शार्दुलने 48 विकेट घेतल्या होत्या.  शार्दुलने त्याच्या डेब्यू मॅचमध्ये सचिन तेंडूलकर यांचा नंबर असणारी 10 नंबरची जर्सी घातली होती. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर अनेकांना ट्रोल केले होते. त्यानंतर त्याने जर्सीचा नंबर बदलून 54 केला.  शार्दुलचे चाहते त्याला ‘लॉर्ड’ म्हणतात.

शार्दुल ठाकूरने आयपीएल बरोबरच विविध मालिकांमध्ये आपल वर्चस्व सिद्ध केलं आहे. आज त्याचा वाढदिवस… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, “लॉर्ड शार्दुल.”


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here