आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

चीनने केलेली “हायपरसॉनिक मिसाईल टेस्ट” नक्की काय आहे ज्यामुळे सर्वच देशांची झोप उडालीय.. !


नेहमीच जगाच्या शर्यतीत अव्वल राहण्याच्या दृष्टीने चीन आपले काम सुरूच ठेवतो. यात काही मोहीम ह्या चीन अतिशय गुप्तरित्या  यशस्वी करत आले आहे. साहजिकच चीनच्या त्या मागचे मनसुबे लोकाना नंतर माहिती होतात. अश्यातच आता चीनबद्दल आणखी एक मोठा खुलासा जगासमोर झाला आहे. चीनने गेल्या महिन्यातच  हायपरसॉनिक मिसाईल टेस्ट केल्याच उघड झाले आहे.

चीनने (China) हायपरसॉनिक मिसाईल टेस्ट (Hypersonic Missile Test)केल्याचं समोर आलं आहे. चीनने ही चाचणी ऑगस्ट महिन्यातच केली होती पण आता त्याचा खुलासा झाला असल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे आवाजाच्या गतीहून अधिक वेगाने जाणारे आणि आपले लक्ष्य भेदण्यापूर्वी पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्याची क्षमता असणारे अणवस्त्र होय. चीनचं हे मिसाईल त्याचं लक्ष्य भेदण्यास अपयशी झालं असून ते त्यापासून 24 मैल दूर गेलं. असं असलं तरी अमेरिकेने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही चीनने हायपरसॉनिक मिसाईलच्या विकासामध्ये मोठी प्रगती केली असल्याच स्पष्ट झालंय.

महत्वाचं म्हणजे चीनने ही अणवस्त्र चाचणी अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकून केली आहे. चीनने केलेल्या या चाचणीचा अमेरिकन गुप्तचर खात्याला जराही अंदाज लावता आला नाही. चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीला अमेरिकेने नेहमीच कमी लेखलं आहे. त्यामुळे आताची घटना ही अमेरिकेच्या गुप्तचर खात्याचं अपयश आहे असं मत अमेरिकेतल्या काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं. या चाचणीवरुन एक स्पष्ट होतंय की चीन आता त्याच्या शत्रूच्या संपूर्ण नुकसानीसाठी वेगवेगळ्या हत्यारांचा विकास करतोय. त्यामुळे अमेरिका, भारत आणि जगाच्या चिंतेत भर पडली आहे.

new google

चीन

हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे काय?

अमेरिका, चीन आणि रशिया हे देश हायपरसॉनिक मिसाईलचा विकास करत आहेत. हायपरसॉनिक मिसाईलचा वेग हा आवाजाच्या पाचपट पण बॅलेस्टिक मिसाईलपेक्षा कमी असतो. पण बॅलेस्टिक मिसाईलप्रमाणे ते ठराविक पॅराबोलिक पद्धतीने फिरत नाही. त्यामुळे त्याला ट्रॅक करणे थोडं अवघड जातं.

चीन जरी या मिसाईलच्या पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला असला तरीसुद्धा येणाऱ्या काही काळात तो नक्कीच याची यशस्वी चाचणी करू शकतो  हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आणि असे झाल्यास चीन पूर्वीपेक्षा आणखी खतरनाक होईल यात काही शंका नाही..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरच्या जागी ‘या’ अष्टपैलू  खेळाडूला निवडलय….! 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here