आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या 5 फलंदाजांनी आतापर्यंत सर्वांत जास्त षटकार ठोकलेत..!

टी -20 स्पर्धांमध्ये अनेक विक्रम होत असतात. चाहते षटकारांचा पाऊस पाडणे आणि चौकार मारणे याशिवाय दुसरी काहीच अपेक्षा करत नाहीत.

आजही काही असे युवा खेळाडूही आहेत जे स्पर्धेत षटकारांचा पाऊस  पाडू शकतात.  नवीन खेळाडू पूर्वीच्या खेळाडूंप्रमाणेच सक्षम आहेत. आजच्या या लेखात आपण  आजपर्यंतच्या टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या पाच खेळाडूंवर एक नजर टाकूया.

new google

 षटकार

 आरोन फिंच: ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच  बऱ्याच काळापासून पॉवर हिटर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याने खेळाच्या सर्वात लहान स्वरुपात आपली ताकद दाखवली आहे. फिंचने 20 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 107 षटकार ठोकले आहेत आणि तो त्याच्या आंतरराष्ट्रीयआकडेवारीमधे आणखी काही षटकार जोडण्याचा प्रयत्न नक्की करेल.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


पुणे वॉरियर्स इंडिया आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना भारतीयांनी आयपीएलमध्ये त्याचे प्रचंड फटके पाहिले आहेत. आरोन फिंचच्या अश्याच काही षटकारांसह ऑस्ट्रेलिया आपल्या देशासाठी प्रथमच ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करेल.

 इयोन मॉर्गन: इंग्लंडच्या 2010 विश्व टी 20 विजेत्या संघाचा भाग असलेला आणखी एक कर्णधा, मॉर्गनने इंग्लंड आणि आयर्लंडच्या टी -20 कारकिर्दीत एकूण 116 षटकार मारले आहेत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएलमध्ये खराब गुणांमुळे मॉर्गन वर्ल्डकपमध्ये स्वत: ची पूर्तता करण्याच्या विचारात असेल.

चाहत्यांना मॉर्गनच्या पॉवर-हिटिंग बद्दल पुरेपूर विश्वास आहे आणि तो आयपीएल मध्ये करू न शकलेल काम या विश्वचषकात नक्की करेल..

षटकार

 ख्रिस गेल: युनिव्हर्स बॉस त्याच्या षटकारांसाठी ओळखला जातो आणि चाहत्यांना गेल वादळाची जाणीव अनेक वेळा आलेली आहे. जेव्हा तो त्याच्या बॅटसह मैदानात उतरतो तेव्हा तो नेहमी मैदानावर  षटकारांचा पाऊस पाडतो. वेस्ट इंडीजसाठी टी -20 फॉरमॅटमध्ये एकूण 121 षटकार गेलने ठोकले आहेत.

जरी गेल या यादीत पहिल्या क्रमांकावर नाही तरीही त्याच्या फॉर्म आणि आक्रमक फलंदाजीवर कोणत्याही प्रकारे प्रश्नचिन्ह लावले जाऊ शकत नाहीत.

सर्वांत स्फोटक फलंदाजांपैकी गेल सर्वांत वर असलेला खेळाडू आहे.

रोहित शर्मा: सर्वाधिक षटकार  ठोकणाऱ्या खेळाडूंच्या या यादीत एकमेव भारतीय खेळाडू आहे तो म्हणजे रोहित शर्मा.  भारतीय सलामीवीर रोहित शर्मा जो अनेक वर्षांपासून संघाचा महत्वपूर्ण भाग आहे.  टी -20 वर्ल्ड कपमध्ये त्याची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

षटकार

मार्टिन गप्टिल: मार्टिन गुप्टिलने न्यूझीलंडसाठी टी -20 फॉरमॅटमध्ये 147 षटकार मारले आहेत आणि त्याला हा विक्रम स्वतःकडे ठेवण्याची संधी आहे. तो या वर्षी सहज 150 षटकारांचा विक्रम मोडू शकतो आणि अव्वल स्थानावर आपले नाव कोरू शकतो. मार्टिनच्या  शक्तिशाली फटकेबाजी आणि जबरदस्त फलंदाजीमुळे तो सर्वच संघांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.  यावर्षी ब्लॅक कॅप्ससाठी एक महत्त्वाचा खेळाडू, गुप्टिल हा  फलंदाज असेल.

अश्या तगड्या  फलंदाजांसाह प्रतेक संघ यावर्षी विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल याविषयी मात्र काहीही शंका नाही. एकंदरीतच या सर्व खेळाडूंचा स्फोटक अंदाज पाहन्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here