मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला मारहाण करून धिंड काढणाऱ्या पंचांना पोलिसांनी अटक केलीय..!


प्रेम प्रकरणातून अनेक घटना घडतांना आपण आजपर्यंत अनेकवेळा पहिल्या आहेत. परंतु सध्या सोशल मिडियावर प्रेम प्रकरणातून गावकऱ्यांनी मुलीच्या प्रियकराला जबरदस्त मारहाण केल्याचा धक्कादायक व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील पंचायत भरी पंचायतीमध्ये एका तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्यानंतर त्याच्या डोक्यावरील सर्व केस कापत गावात त्याची धिंड काढलीय. एवढेच नाही तर गावकऱ्यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तरुणावर गावातील मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. 

तरुणा

या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सांगतात की,  गावातील पंचायतीत तरुणांना मारहाण केल्याचे प्रकरण दोन दिवस जुने आहे. आज व्हायरल व्हिडिओच्या आधारे कारवाई केली जात आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि आतापर्यंत गावच्या दोन पंचांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!


काय आहे संपूर्ण प्रकरण ?

जिल्ह्यातील किरतपूर पोलीस ठाण्यातील बुधपूर नैन सिंह गावातील रहिवासी विपुल नावाच्या व्यक्तीला गावकऱ्यांनी चप्पल आणि काठ्यांनी मारहाण केली. या तरुणाने बराच काळ शेजारच्या मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या तरुणाचे प्रेमसंबंधही मुलीसोबत सुरू असल्याची माहिती आहे.

विनयभंगाच्या आरोपावरून गावकऱ्यांनी त्या तरुणाला पंचासमोर दिवसाढवळ्या मारहाण केली, डोक्याचे केस काढून टाकले आणि भरलेल्या पंचायतीत लाजिरवाणी केली. गावकऱ्यांनी त्या तरुणाचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हायरल व्हिडिओबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तरुण

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. किरतपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी राजकुमार शर्मा यांनी फोनवर सांगितले की, एका तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. घटना 1-2 दिवसापूर्वीची आहे. मारहाणीनंतर तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. केस कापणाऱ्या नाईलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रेमप्रकरणातून  अश्या घटना वाढल्यामुळे पोलिसांनीही चिंता व्यक्त केली आहे. एकंदरीत या सर्व प्रकारातून गावठी पंचयातीचा प्रताप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here