आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

विश्वचषकानंतर या खेळाडूच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडणे जवळपास निश्चित झालय..


भारतीय क्रिकेट संघाचा संध्याचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसापूर्वीच भारतीय संघच कर्णधारपद विश्वचषक स्पर्धेनंतर  आपण सोडणार असल्याचं जाहीर केलं होते. त्यामुळे तेव्हापासून आता टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असेल याबद्दल अनेक दिग्गज लोक आपलं मत व्यक्त करत आहे. ज्यात प्रामुख्याने कर्णधार पदाचे दावेदार म्हणून शिखर धवन, रोहित शर्मा आणि रिषभ पंतच्या नावाची चर्चा केली जातेय.

संघ

विराट कोहलीने टी -20 वर्ल्डकपनंतर टी -20 फॉरमॅटमधून टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत टी 20 विश्वचषक 2021 नंतर टीम इंडियाला एक नवीन कर्णधार मिळेल. आतापर्यंत बीसीसीआयने या संदर्भात आपले कार्ड उघडलेले नाही. पण आता या प्रकरणाचा खुलासा होताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांच्या अहवालांमध्ये, टी -20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला टी 20 क्रिकेटमध्ये नवीन कर्णधार मिळेल असं जाहीर केलं आहे.

new google

हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


न्यूझीलंडविरुद्धच्या टी -20 मालिकेत भारत नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला नवा कर्णधार करण्यात येईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने उघड झाले आहे. बीसीसीआयच्या एका स्रोताच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, पुढे कोण कर्णधार असेल हे आजूनही गुप्त आहे.पण रोहित शर्मा हा भारतीय संघाचे नेतृत्वकरण्यास सक्षम आहे अस मत बीसीसीआयच्या सर्वच सदस्यांनी मांडले आहे आणि रोहितच टी -20 विश्वचषकानंतर विराटची जागा घेईल हे जवळपास निच्छित करण्यात आलं आहे. वर्ल्डकपनंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.

संघ

विराट कोहलीने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी टी 20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. कामाचा ताण व्यवस्थापन लक्षात घेऊन त्यानी हा निर्णय घेतला. कर्णधार म्हणून कोहली पहिल्यांदा टी -20 विश्वचषक खेळणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत तीन आयसीसी स्पर्धा खेळल्या आहेत. ज्यात 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 विश्वचषक आणि 2021 विश्व कसोटीचा समावेश आहे  पण त्याला आतापर्यंत संघासाठी कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

येणाऱ्या काळात आता कोण भारतीय संघाची धुरा सांभाळणार हे जवळपास निश्चित झालं असून रोहितच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here