आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

टी -20 विश्वचषक स्पर्धेत हे ३ फिरकी गोलंदाज विरोधी संघासाठी सर्वांत जास्त धोकादायक ठरू शकतात…!


इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर संपूर्ण क्रिकेट जग आयसीसी टी -20 विश्वचषकाच्या रंगात रंगण्यास उत्सुक आहे. संयुक्त अरब अमिरातीसह ओमानमध्ये आयसीसी टी -20 विश्वचषकाचे आयोजन केले जात आहे. या विश्वचषकातील सुपर -12 सामने यूएईच्या मैदानावर खेळले जातील.

या विश्वचषक स्पर्धेत हे 3 फिरकी गोलंदाज फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात

नुकत्याच संपलेल्या आयपीएल दरम्यान फिरकी गोलंदाजांनी यूएईच्या खेळपट्ट्यांवर उत्तम जादू दाखवली. यावेळी यूएईच्या खेळपट्ट्या जरा संथ दिसत आहेत. अशा परिस्थितीत विशेषत: टी-20 विश्वचषकात फिरकी गोलंदाज पाहायला मिळत आहेत. तसे सर्वच संघांकडे फिरकी गोलंदाजांचे अनेक पर्याय आहेत. परंतु सर्व संघांच्या फिरकी गोलंदाजांपैकी आम्ही तुम्हाला ते 3 फिरकी गोलंदाज सांगनार आहोत जे या टी 20 विश्वचषकात सर्वात प्रभावी ठरू शकतात,तर चला त्या 3 फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीकडे एक नजर टाकूया..

new google

हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


अॅडम झांपा: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेटचे 5 विश्वचषक जिंकले आहेत, परंतु या दिग्गज संघाला आजपर्यंत T20 विश्वचषक जिंकता आलेला नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ त्याच आशेने मैदानात उतरेल. या संघात अनेक मोठी नावे आहेत, ज्यांच्याकडे आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्याची क्षमता आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघात अशा नावाचा समावेश आहे ज्यांची उपस्थिती त्यांच्यासाठी या विश्वचषकात खूप प्रभावी ठरू शकते. आम्ही येथे फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पाविषयी बोलत आहोत. अॅडम झांपा ने आपल्या फिरकी गोलंदाजीने खूप छाप पाडली आहे आणि यूएईच्या खेळपट्ट्या ज्याप्रमाणे आहेत, अॅडम झांपा त्याच्या फिरकीने फलंदाजांना नाचवू शकतो.त्याच्या कामगिरीवर संघाचा पुढील प्रवास ठरेल..

विश्वचषक

वरुण चक्रवर्ती: भारतीय क्रिकेट संघात फिरकी गोलंदाजीचे अनेक पर्याय आहेत ज्यामध्ये सर्वोत्तम कोणता हे सांगणे फार कठीण आहे. टी -20 वर्ल्डकपमध्येही भारताने आर अश्विन, रवींद्र जडेजा सारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे, पण तरुण फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीबद्दल बरीच चर्चा केली जात आहे.

वरुण चक्रवर्तीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे. पण या T20 विश्वचषकातील तो सर्वात धोकादायक फिरकी गोलंदाज मानला जात आहे. या फिरकी गोलंदाजाने आपल्या गूढ गोलंदाजीने आयपीएलमध्ये बड्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. वरुणने 17 सामन्यांमध्ये केवळ 18 बळी मिळवले. यानंतरही  वरुण चक्रवर्तीच्या या टी-20 विश्वचषकातील फिरकी कामगिरीवर अनेक लोकांच लक्ष असेल .भारताला तर विश्वचषक जिंकायचा असेल तर वरूनची जादू चालणे अत्यंत गरजेचे आहे..

राशिद खान: जागतिक क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांमध्ये दिग्गजांची नावे आहेत, परंतु गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खान या दिग्गज फिरकी गोलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. राशिद खानने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट टी -२० क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी प्रभावी कामगिरी केली आहे.

राशिद खानने या फॉरमॅटमध्येही फलंदाजांना शांत ठेवले आहे. संपूर्ण क्रिकेट जगतात वेगवेगळ्या टी -20 क्रिकेट लीग खेळणाऱ्या रशीद खानने फलंदाजांवर पूर्णपणे तडा दिला आहे. अशा परिस्थितीत रशीद खान या टी 20 वर्ल्डकपमध्ये अत्यंत जबरदस्त फिरकी गोलंदाज म्हणून सिद्ध होऊ शकतो. फलंदाज नेहमी त्याच्या चेंडूंमधून सावरण्याचा प्रयत्न करतो.

एकूणच या तीन फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीकडे संपूर्ण जागाच लक्ष असणार आहे एवढ मात्र नक्की…!


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here