आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

पाकिस्तानकडून झालेल्या कडव्या पराभवामुळे या दोन खेळाडुंच संघातील स्थान धोक्यात आलंय..!


ICC T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा 10 विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यापूर्वी भारतीय संघ हा सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र पाकिस्तान संघाने शानदार कामगिरी करत हा सामना सहज जिंकला. भारतीय संघाच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर संघाच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसून येते.

या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय योग्य ठरला. भारतीय संघ निर्धारित 20 षटकांत 7 विकेट गमावून केवळ 152 धावा करू शकला. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 17.5 षटकांत 10 विकेट्स राखून सामना सहज जिंकला. भारताच्या या मोठ्या पराभवानंतर संघ निवडीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर आज आम्ही तुम्हाला सांगूया की पुढील सामन्यात संघ कोणत्या 2 खेळाडूंना प्लेइंग 11 मधून वगळण्याचा निर्णय घेऊ शकतो.


हेही वाचा…

new google

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


 हार्दिक पांड्या: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बर्‍याच दिवसांपासून फिटनेसच्या समस्येशी झुंज देत आहे, त्यामुळे सराव सामन्यांमध्येही तो गोलंदाजी करताना दिसला नाही. पण मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता पाहून त्याला या मोठ्या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आले. पण या सामन्यातही हार्दिकचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो बॅटने कोणतेही योगदान न देता पॅव्हेलियनमध्ये परतला.

पाकिस्तान

भारताला हार्दिककडून चांगल्या खेळाची गरज असताना तो केवळ 11 धावा करून बाद झाला. यानंतर हार्दिक दुखापतीमुळे मैदानात उतरलाही नाही. अशा स्थितीत भारतीय संघ पुढील सामन्यात शार्दुल ठाकूरला त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्याचा विचार करू शकतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वेगवान गोलंदाजीसोबतच गरज पडल्यास क्रमवारीत उतरून मोठे फटके खेळण्यातही शार्दुल पूर्णपणे सक्षम आहे.

वरुण चक्रवर्ती:  पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनऐवजी मिस्ट्री ऑफ स्पिनर वरुण चक्रवर्तीसोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या वरुणला या सामन्यात एकही विकेट घेण्यात अपयश आले आणि तो चांगलाच महागात पडला. वरुण हा चांगला फिरकी गोलंदाज असला तरी मोठ्या सामन्यांमध्ये अनुभवी गोलंदाजासोबत जाणे हा योग्य निर्णय असल्याचे सिद्ध होते. अश्विनला अशा सामन्यांमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे आणि तो या सामन्यात चांगला पर्याय ठरू शकला असता. अशा स्थितीत वरुणची या सामन्यातील कामगिरी पाहता पुढील सामन्यात संघ अनुभवी आर अश्विनचा त्याच्या जागी समावेश होऊ शकतो अशी अपेक्षा आहे.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here