आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारताला मोठ्या फरकाने हरवून सुद्धा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने केलेल्या वक्तव्याने चाहत्यांची मने जिंकलीत..!


पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतर कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा होती की न्यूझीलंडविरुद्ध परतताना टीम इंडिया सर्वांना दिलासा देईल, परंतु तसे झाले नाही. न्यूझीलंडविरुद्धही भारतीय संघाचा पराभव झाला.

भारताचा पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी पराभव झाला,  तर न्यूझीलंडने 8 विकेट्सने पराभूत केले. यावेळी पराभवाचे मुख्य कारण म्हणजे भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवल्यानंतर काय म्हटले ते जाणून घेऊया.

भारताविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, “सामन्यांमध्ये नेहमीच एक रणनीती असते. पण एका चांगल्या भारतीय संघासमोर माझ्या संघाच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीमुळे मी आनंदी आहे. संपूर्ण सामन्यात आम्ही दडपण निर्माण करण्यात यशस्वी झालो.

new google

आणि सलामीवीर ज्या प्रकारे खेळले त्यामुळे व्यासपीठ अधिक मजबूत झाले.त्याच्या संघाच्या गोलंदाजीबद्दल केन म्हणाला, आमच्या गोलंदाजी आक्रमणाचा समतोल दोन फिरकीपटूंनी बनलेला आहे, मला वाटते की एक युनिट म्हणून संघाची कामगिरी प्रभावी होती.

केन विल्यमसन

केन विल्यमसन पुढे म्हणाला, आम्ही आमच्या पहिल्या सामन्यात (पाकिस्तानविरुद्ध) बर्‍याच सकारात्मक गोष्टी पाहिल्या आणि त्यावर आम्ही आमची तयारी केली. आम्ही सर्व जागतिक दर्जाच्या संघांविरुद्ध खेळत राहतो, आमचा खेळ खेळणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

केन विल्यमसनने फिरकीपटू आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ इश सोधीबद्दल सांगितले की, ईश हा एक उत्कृष्ट टी-20 गोलंदाज आहे, प्रामुख्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये तो संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याने अनेक स्पर्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथील परिस्थितीमध्ये तो मोठी भूमिका बजावतोय हे पाहून आनंद झाला.

शिवाय केन विल्यमसन  भारतीय संघाची स्तुती करण्यास सुद्धा विसरला नाही. आम्ही एका दिग्गज संघाला जरी हरवल असलं तरीही भारत नेहमीच एक यशस्वी संघ राहिला असल्याचंही तो म्हणाला.

भारत-न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाच्या फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली आणि त्यांना 20 षटकांत 7 विकेट गमावून केवळ 110 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने ३३ चेंडू बाकी असताना केवळ २ गडी गमावून हे सोपे लक्ष्य गाठले. दोन महत्त्वपूर्ण विकेट घेणारा फिरकीपटू ईश सोधीला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here