आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

” भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री 24तास नशेत असतात”या व्यक्तीने रवी शाश्त्रींवर गंभीर आरोप लावलेत…


टीम इंडियाची या विश्वचषकातील  निराशाजनक कामगिरी पाहता सर्व स्तरातून संघ आणि संघ व्यवस्थापनावर सडकून टीका होताना दिसत आहे. काहीनी तर चक्क  कर्णधार विराट कोहलीच्या अवघ्या दहा महिन्याच्या मुलीलाही यात ओढले. शिवाय मोहम्मद शमी आणि इतर खेळाडूंनाही चांगलच  ट्रोल केल गेल. यांच्यानंतर आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर झालेल्या टीकेनं खळबळ उडाली आहे.

Ravi Shastri drops BIG HINT on stepping down as Team India coach after T20 World Cup, says THIS | Cricket News | Zee News

अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरकेने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. शास्त्री 24 तास नशेच्या धुंदीत असतात असा गंभीर आरोप कमाल आर खानने केला आहे.केआरकेने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने न्यूझीलंडविरोधात झालेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचे विश्लेषण करत कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक शास्त्रींना लक्ष्य केले आहे.

रवी शास्त्री २४ तास नशेच्या धुंदीत असतात. एखाद्या लहान मुलाने त्यांचा चेहरा पाहिला तर तो चार दिवस रडत राहील. जेव्हा विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात पहिलं षटक कोणाला द्यावे असे विचारले असेल तेव्हा नशेच्या धुंदीतच त्यांनी विराटला वरुन चक्रवर्तीला पहिले षटक टाकायला सांग असे सांगितले असेल,”असं केआरकेने म्हटलं आहे.

new google

रवी शास्त्री

दुसरीकडे केआरकेने वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेवरुनही टीम इंडियावर निशाणा साधला आहे. नाणेफेक हरल्यानंतर कोहली घाबरला, त्याच्या भीतीचा काही ठाव ठिकाणा नव्हता. कोहलीने तेव्हाच मान्य केलं की आपण हा सामना १०० टक्के गमावणार आहोत, असा आरोपही केआरकेनं केलाय.

रोहित शर्माच्या आधी ईशान किशनला सलामीला पाठवण्याचा भारतीय संघाचा निर्णयही चांगलाच चुकला. तो मुलगा कधी कधी आयपीएलमध्ये धावा करतो, पण आंतरराष्ट्रीय सामने खेळणे आणि आयपीएल खेळणे या दोन वेगवेगळ्या आहेत, असंही केआरकेनं म्हटलं आहे.

रवी शास्त्रींवर आधीच बेवडे असल्याची टीका होत असते. त्यांच्यावर अनेक मिम्सही याआधी बनलेले आहेत. मात्र केआरकेच्या आरोपींनी नक्कीच खळबळ उडाली आहे.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here