आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

पतीच्या निधनानंतर स्वतः शेती करत या महिलेने 25 ते 30 लाखांचं उत्पादन काढलंय..!


एखाद्या महिलेचा नवरा या जगातून निघून गेला तर लोक त्या स्त्रीला असहाय्य समजू लागतात. एक स्त्री लोकांच्या नजरेत कमकुवत असते आणि तिच्या कुटुंबाची योग्य काळजी घेऊ शकत नाही असचं सहसा समजले जाते आणि मुद्दा जेव्हा शेती करण्यावर येतो तेव्हा तर या क्षेत्रात स्त्रीला शून्य मानले जाते.

परंतु समाजात अनेक अश्या स्त्रिया आहेत ज्यानी समाजाचा हा विचार चुकीचा असल्याचे सिद्ध केले आहे. अशीच काहीसी कहाणी याही महिलेची आहे.

महाराष्ट्रातील नाशिकमधील मातोरी गावात राहणाऱ्या संगीता पिंगळ यांनी सुद्धा अनेक कठीण प्रसंगांना मात देत स्वतःला सिद्ध करून दाखवलय.. स्त्री शेती करू शकत नाही असे मानणाऱ्या सर्व लोकांना चुकीचे सिद्ध करायचे होते असे संगीता सांगते. संगीताला तिच्या आयुष्यात एकामागून एक संकटांना सामोरे जावे लागले.

new google

2004 मध्ये जन्माच्या गुंतागुंतांमुळे तिने तिचे दुसरे मूल गमावले. यानंतर 2007 मध्ये त्यांच्या पतीने रस्ता अपघातात या जगाचा निरोप घेतला. त्या दिवसांत संगीता 9 महिन्यांची गरोदर होती. या घटनांनंतर संगीता तुटली होती पण तिच्या सासरच्यांनी तिला धीर दिला आणि तिचे मनोबल वाढवले.

संगीता यांचे कुटुंब शेतीतून चालत असे. पतीच्या निधनानंतर सासरची मंडळी आणि पती 13 एकर शेती करत असे  मात्र पतीच्या निधनानंतर काही वर्षांनी सासरच्या मंडळींनीही हे जग सोडले. यानंतर संगीता यांनी त्यांच्या जमिनी सांभाळण्याची जबाबदारी घेतली.

शेती हे एकमेव माध्यम होते ज्यावर त्यांचे कुटुंब चालत होते. एकटी स्त्री शेती करू शकणार नाही असा विश्वास असल्याने सर्व नातेवाईक वेगळे झाले. पण संगीताने सर्वांचा विचार खोटा ठरवला आणि शेतात एकटीच काम करू लागली.

शेतीसाठी पैशांची गरज होती त्यासाठी संगीताने आपले सोने गहाण ठेवले आणि कर्ज घेतले. संगीताच्या या संघर्षात त्यांना भावांची साथ मिळाली. त्यांनी संगीताला शेतीबद्दल सर्व काही शिकवले. संगीता यांचे विज्ञान विषयाचे शिक्षण शेतीतही कामी आले.शेती क्षेत्रात ती पुढे जाऊ लागली पण त्यासोबतच तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

पती

कधी पाण्याचा पंप खराब व्हायचा तर कधी पिकात किडे पडायचे. पण संगीताने हार मानली नाही आणि पुढे जात राहिली. ती ट्रॅक्टर चालवायलाही शिकली आणि शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवायला लागली.

संगीताने तिच्या शेतात द्राक्षे आणि टोमॅटो पिकवायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या मेहनतीला रंग येऊ लागला आणि त्यांनी लावलेली द्राक्षे 800 ते 1000 टनांपर्यंत वाढू लागली. लोक जिला असहाय्य समजत होते त्या संगीताने आपल्या मेहनतीने 25-30 लाख रुपये कमावले.

तिच्या एका मुलाखतीत संगीता म्हणाली की ती अजूनही शेतीबद्दल शिकत आहे. तीची मुलगी पदवीचे शिक्षण घेत आहे मुलगा खासगी शाळेत शिकतो. संगीताच्या मते शेतीने तिला धीर धरायला शिकवले. एकट्या जीवावर जरी संगीताने सर्व केल असल तरीही ती यात आपल्या भावांनाही श्रेय देते..


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here