आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

ऑक्सफर्ड विद्यापीठातून वकिलीच शिक्षण घेऊन वकील बनलेल्या कॉर्नेलिया सोराबजी भारताच्या पहिल्या महिला वकील होत्या..!


निसर्गाने स्त्रियांना समान नैसर्गिक अधिकार दिले आहेत पण जुन्या काळात समाजाने तिथेही बेड्या घातल्या आहेत.मग ते घराबाहेर पडण्यावर बंदी असो वा शिक्षण घेण्यावर असलेली बंदी. त्याकाळी सर्वच ठिकाणी स्त्रियांच्या अधिकारांवर बंधने घातली गेली होती. हे सर्व पुरुषांनी नेहमीच स्त्रियांवर त्यांच्या मनाप्रमाणे बंधने लादली आहेत आणि लादत आहेत. पूर्वी ही सर्व बंधने झुगारून शेकडो महिलांनी स्वबळावर जगण्यासाठी सतत संघर्ष केला होता.

आज पांढरी साडी, केस बांधलेले, डाव्या हातात बारीक घड्याळ आणि हाताने कृती करून अनेक महिला वकील न्यायालयात वाद घालताना आपण पाहिले आहेत. चित्रपटांमध्ये टीव्ही मालिकांमध्ये आणि खऱ्या आयुष्यातही आपण न्यायालयात महिला वकील पहिल्या आहेत. परंतु तुम्हाला भारतातील पहिल्या महिला वकीलाबद्दल माहिती आहे का ?

कॉर्नेलिया सोराबजी

new google

इंदिरा जयसिंग, कामिनी जयस्वाल, करुणा नंदी, रेबेका जॉन या भारतातील काही नामांकित महिला वकीलांपैकी एक आहेत. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख दिसून येतो. वकिली क्षेत्रातही महिलांना बराच काळ संघर्ष करावा लागलाहोता आणि या संघर्षाची सुरवात कॉर्नेलिया सोराबजी यांनी सुरु केली होती.

कॉर्नेलिया सोराबजी ह्या वकिली शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

कॉर्नेलिया सोराबजी कोण होत्या?

कॉर्नेलिया सोराबजी यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1866 रोजी नाशिक महाराष्ट्र येथे झाला. कॉर्नेलियाचा जन्म रेव्हरंड सोराबजी कारसेदजी,फ्रान्सिना फोर्ड यांच्याकडे पारशी कुटुंबात झाला. बहुतेक मुलं संस्कार आणि सामाजिक माहिती घरून शिकतात असं म्हणतात कॉर्नेलियासोबतही असंच काहीसं घडलं. तिच्या आईने पुण्यात महिलांसाठी शाळा उघडली, ती महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवत असे. कॉर्नेलियाही हे सर्व बघतच मोठी झाली. आणि तिच्यातही आपसूकच महिलांच्या या कामाविषयी उत्सुकता वाढू लागली.

स्थानिक महिला कॉर्नेलियाच्या आईकडे मालमत्तेशी संबंधित प्रश्नांवर त्यांचे मत जाणून घेण्यासाठी येत होत्या आणि या सर्व गोष्टींचा कॉर्नेलियावर खोल परिणाम झाला. कॉर्नेलियाच्या वडिलांनी तिला स्वतःच्या मिशन स्कूलमध्ये शिकवले. कॉर्नेलियाच्या वडिलांनी आपल्या दोन मोठ्या मुलींना बॉम्बे विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु केवळ मुलगी असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही दिवसांनंतर विद्यापीठाला आपला निर्णय बदलावा लागला आणि कॉर्नेलियाने वयाच्या 16 व्या वर्षी मॅट्रिक पूर्ण केले.

बेंजामिन जोवेट यांनी कॉर्नेलियाला मदत केली आणि विशेष कायद्याचा अभ्यासक्रम सुरू केला. बेंजामिन आणि काही इंग्रजांनी कॉर्नेलियाला कॉन्ग्रेगेशनल डिक्रीद्वारे आवाहन केले की तिला ऑक्सफर्डच्या सॉमरविले कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी. तिने 1892 मध्ये ही परीक्षा दिली आणि ही परीक्षा देणारी पहिली महिला ठरली.

कॉर्नेलिया सोराबजी

कॉर्नेलिया परदानशिन स्त्रियांचा आवाज बनली. लग्नानंतर महिलांना आवरणे आवश्यक होते. या महिलांना त्यांच्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषाशी बोलण्याची परवानगी नव्हती. विधवांना कोणत्याही पुरुषाशी बोलता येत नव्हते. अश्या जाचक अटीपासून कॉर्नेलिया  यांनी महिलांना थोडातरी धीर देण्याचं ठरवलं होत.

अशा महिलांना कायद्याचे ज्ञान नव्हते. माहितीअभावी स्त्रिया, विधवा, बाल विधवा, लहान मुले अनेकदा खोटेपणाचे बळी ठरले, कधी कधी तर मालमत्तेसाठी खूनही झाले. अशा महिलांसाठी कॉर्नेलियाने लढा दिला. कॉर्नेलियाने सुमारे 600 महिला आणि मुलांना मदत केली.

1924 मध्ये जेव्हा महिलांना भारतात वकिली करण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा कॉर्नेलियाच्या आजीवन लढ्याचे फळ मिळाले. कॉर्नेलियाने १९२९ पर्यंत कोलकात्यात वकिली केली आणि नंतर निवृत्त झाल्या. यानंतर त्या इंग्लंडला गेल्या आणि 1954 मध्ये मृत्यूपर्यंत तिथेच राहिल्या.

कॉर्नेलियामुळेच महिला कोर्टात डोकं उंच करून उभ्या राहून अनेक निराधारांना न्याय मिळवून देत आहेत.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here