आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

विदर्भाच्या या पोट्ट्याने क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणालाही नं जमलेला विश्वविक्रम केलाय..!


क्रिकेटचा सर्वांत छोटा फोर्मेट टी-२० आहे. ज्यात अनेक दिग्गज गोलंदाजाना अक्षरशा फलंदाज कुटून धावा काढतात. कितीही चांगला गोलंदाज असला तरीही डेथ ओव्हरमध्ये तरी त्याला रन्स पडतातच.

सध्या सुरु असलेल्या सय्यद सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मात्र एका गोलंदाजाने कामालाच केली आहे. टी-२० मधील आपला चार षटकांचा स्पेल चक्क एकही धाव काढू नं देता या गोलंदाजाने समाप्त केला आहे.

ही कामगिरी केलीय युवा फिरकीपटू अक्षय कार्नेवार याने..

new google

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मणिपूर-विदर्भ यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टी-20 क्रिकेटचा ऐतिहासिक विक्रम झाला. सोमवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात फिरकीपटू अक्षय कार्नेवारने आपल्या चार षटकांत विरोधी संघाला एकही धाव घेऊ दिली नाही. देशांतर्गत आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. विदर्भाकडून खेळताना अक्षयने आपल्या चारही षटकांत एकही धाव दिली नाही एवढेच नाही तर त्याने मणिपूरच्या दोन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अक्षयच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विदर्भाने १६७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

क्रिकेट

या सामन्यात विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या. जितेश शर्मा आणि अपूर्व वानखेडे यांनी नाबाद राहताना ७१ आणि ४९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मणिपूरचा संघ १६.३ षटकांत अवघ्या ५५ ​​धावा करून सर्वबाद झाला. या विजयासह विदर्भाने प्लेट गटात अव्वल स्थान कायम राखले आहे.

केकेआरचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर मध्य प्रदेशकडून खेळत असून त्यानेही सोमवारी सामन्यात जादू केली. बिहारविरुद्ध व्यंकटेशने तगडी गोलंदाजी करताना 4 षटकांत केवळ 2 धावांत 2 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. व्यंकटेशने त्याच्या स्पेलमध्ये 2 ओव्हर मेडन्सही टाकल्या. ग्रुप स्टेजच्या या सामन्यात मध्यमगती गोलंदाज व्यंकटेशच्या छोट्या चेंडूंवर बिहारच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते. त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये अय्यरने 22 चेंडूत डॉट काढले.

युवा फिरकीपटू अक्षय कार्नेवारने केलेल्या या कामगिरीमुळे  सर्वच क्रिकेट रसिकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत. तर दिग्गज क्रिकेटपटू त्याचं अभिनंदन करत आहे. अशी कामगिरी करणारा तो आतापर्यंतचा पहिला गोलंदाज असल्यामुळे साहजिकच त्याच्यानावावर एक नवा विश्वविक्रम जमा झाला आहे.

येणाऱ्या काही दिवसात तो  भारतीय संघाचे दरवाजे ठोठावण्यास नक्कीच येऊ शकतो..


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here