आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

रोहित शर्मासाठी धोकादायक ठरतोय हा भारतीय खेळाडू, लवकरच घेऊ शकतो रोहितची जागा…!


विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाच्या टी-२० कर्णधार पदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. रोहितकडे मुंबई इंडियन्स  संघाचं नेतृत्व अगोदरच होते. आता तो भारतीय संघाचा देखील कर्णधार बनला आहे.

मधल्या फळीतील फलंदाजातून सलामीवीर बनण्याचा रोहित शर्माचा फॉर्म्युला इतका हिट ठरला, की त्याची फळे आजवर टीम इंडियाला मिळत आहेत. ज्याप्रमाणे रोहित शर्माला मधल्या फळीतील फलंदाजातून सलामीवीर बनवले गेले, त्याचप्रमाणे टीम इंडियाच्या या खेळाडूला सलामीवीर बनवले जाऊ शकते. जर टीम इंडियाचा हा खेळाडू मधल्या फळीतून सलामीवीर बनला तर टीम इंडियाला मोठा फायदा होईल, कारण त्यानंतर या फलंदाजाची बॅट जोरदार फटकेबाजी करेल.
हा खेळाडू रोहितसारखा सलामीवीर होऊ शकतो.

ICC रैंकिंग: ऋषभ पंत का कमाल, टॉप रैंक वाले विकेटकीपर बल्लेबाज बने - At  13th spot, Pant is now world's best ranked keeper in Tests tspo - AajTak

new google

रोहित शर्माप्रमाणेच ऋषभ पंतलाही मधल्या फळीतील फलंदाजातून सलामीवीर बनवले जाऊ शकते. टीम इंडियाचा सर्वात मोठा फायदा हा असेल की ऋषभ पंत हा डावखुरा फलंदाज आहे जो सलामीला कोणत्याही विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. ऋषभ पंत टीम इंडियाचा सलामीवीर बनला तर तो या ठिकाणी दीर्घकाळ वादळ निर्माण करू शकतो. ऋषभ पंतही कर्णधारपदात माहिर आहे. येत्या काही दिवसांत तो सलामीसोबतच कर्णधारपदातही रोहित शर्माशी स्पर्धा करेल.

ऋषभ पंतकडेही धोनीइतकीच ताकद आहे. 2007 मध्ये जेव्हा धोनीला टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले होते, तेव्हा त्याचा उपयोगही चांगला झाला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मैदानावरील कोणत्याही खेळाडूपेक्षा यष्टीरक्षकाला खेळ जास्त कळतो त्यामुळे पंतचा वापर धोनीप्रमाणे होऊ शकत, हे सर्वांना माहीत आहे.

रोहित शर्मा

आगामी काळात वाढत्या स्पर्धेमुळे ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या अडचणी वाढू शकतात. रोहित शर्मा सध्या 34 वर्षांचा आहे युवा आणि 2023 वनडे वर्ल्डकप लक्षात घेऊन मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक फार दूर नाही, ज्यासाठी टीम इंडियाला आतापासून तयारी करावी लागेल. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक भारतात आहे त्यासाठी टीम इंडिया पूर्ण ताकद लावेल. टीम इंडियामध्ये असे काही मजबूत खेळाडू आहेत जे लवकरच टीम इंडियातून ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा पत्ता कट करू शकतात. त्यामुळे रोहित दीर्घकाळ संघात आपल स्थान बनवून ठेवू शकेल का नाही हे पाहणे हि रंजक ठरणार आहे.

मधल्या फळीतील फलंदाजातून रोहित शर्माला सलामीवीर बनवण्याचा धोनीचा निर्णय होता. या कारणास्तव रोहित शर्माने वनडेमध्ये 3 द्विशतके झळकावली. त्यात रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक 264 धावांचाही समावेश आहे. रोहित शर्मा जसा सलामीवीर बनल्यानंतर हिट ठरत आहे तसाच ऋषभ पंतही सलामीवीर झाल्यानंतर कहर करू शकतो. आता येणाऱ्या काही काळात रिषभ पंतला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

असे झाल्यास रिषभ पंत आपल्या खेळाने त्या संधीचे सोने करण्यास कोणतीही कसर सोडणार नाही हे मात्र नक्की..!


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here