आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

व्यंकटेश अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या संघात निवडल्यामुळे आकाश चोप्रा नाराज झालाय…!


T20 WC मधून बाहेर पडल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातील काही खेळाडूंच्या निवडीमुळे भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा खूश नाहीये. आकाश चोप्राने दिलेल्या प्रतिक्रियेवरून तो या निवडीवर नाराज असल्याचं स्पष्टपने जाणवतंय..

या आंतरराष्ट्रीय मालिकेत व्यंकटेश अय्यरची प्रथमच निवड झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली हे पाहता बोर्डाने किवी संघाविरुद्ध  युवा क्रिकेटपटूंची निवड केली असून काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. पण आकाश चोप्रा हे मान्य करत नाही. या बाबत त्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

व्यंकटेश अय्यर

new google

मंगळवारी संध्याकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा करताना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ४ युवा खेळाडूंचा न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत समावेश केला आहे. यापैकी एक नाव व्यंकटेश अय्यर याचेही आहे. ज्याच्या नावाने माजी भारतीय क्रिकेटर आणि सध्याचे समालोचक चांगलेच संतापले. यासाठी त्यांनी चेतन साकारिया यांचे उदाहरण देत हा भारताचा चुकीचा निर्णय कसा ठरू शकतो हे सांगितले.

आकाश चोप्राने संघ निवडीनंतर ट्विटरवर एक पोस्ट लिहिली होती.

‘आणि आम्ही हे विसरता कामा नये की आयपीएलचा अर्धा हंगाम संपल्यानंतर आम्ही चेतन साकारियाचाही संघात समावेश केला होता. आता अय्यरच्या बाबतीतही तेच घडत आहे आशा आहे की इथेच दोघांमधील साम्य संपेल.श्रीलंका दौऱ्यावर चेतन साकारियाचा भारतासोबतच्या मुख्य संघात समावेश करण्यात आला होता. मात्र मिळालेल्या संधींचा तो फायदा घेऊ शकला नाही.

व्यंकटेश अय्यरलाही कमी अनुभव असल्यामुळे येत्या काळात त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जाऊ नये  असंही आकाश चोप्रा म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अय्यरला फिनिशरची जबाबदारी मिळू शकते असा विश्वास माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने व्यक्त केला आहे. दुसरीकडे  विराट कोहलीला कसोटी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय जसप्रीत बुमराहलाही संघात स्थान मिळालेले नाही. रोहित शर्माला T20 चा कर्णधार घोषित करण्यात आले आहे. दुसरीकडे केएल राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध 16 जणांचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here