आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

दोन टप्पे पडत आलेल्या चेंडूवर षटकार ठोकत वार्नरने खेळ सद्भावनेचा अपमान केल्याचं बोललं जातंय..!


काल टी-२० विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान संघ सुद्धा बाहेर फेकल्या गेला. ऑस्ट्रोलीयाने रोमहर्षक अश्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत फायनल मध्ये प्रवेश केला.

या ऑस्ट्रोलीया आणि पाकिस्तान संघात झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात एक विचित्र घटना घडली. ज्यावरून क्रिकेट दिग्गज आपापली मते मांडत आहेत. काही या घटनेला बरोबर बोलत आहेत तर काही लोक ते खेळभावनेचा अनादर असल्याचं म्हणत आहेत.

डेव्हिड वॉर्नर

new google

काय झालं होत नक्की?

ऑस्ट्रोलीयान फलंदाज डेव्हिड वार्नर सामन्यात सुरवातीपासूनच चांगल्या लयमध्ये फलंदाजी करत होता. त्याने 49 धावांची चांगली खेळी केली. या खेळीदरम्यान वॉर्नरने मोहम्मद हाफिजच्या विचित्र चेंडूवर असा षटकार ठोकला जो पाहून सर्व क्रिकेट चाहत्यांना हसू आवरलं नाही.

सुरवातीला तर हा प्रकार हास्यास्पद वाटत होता पण जेव्हा पाकिस्तान संघ पराभूत झाला. तेव्हा याच प्रसंगावरून वाद निर्माण व्हायला सुरवात झाली.

खरे तर ऑस्ट्रेलिया फलंदाजी करतांना डावातील सातवे षटक टाकायला आलेल्या मोहम्मद हफीजने पहिला चेंडू टाकला पण तो त्याच्या हातातून नीट  सुटला नाही आणि चेंडू दोन  टप्पे पडत वॉर्नरकडे पोहोचला. वॉर्नरनेही चेंडूचा पाठलाग केला आणि लेग साईडकडे जात त्यावर जोरदार षटकार मारला.

अंपायरने त्याला नो बॉल देखील म्हटले,ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात एकही चेंडू न पडता सात धावा जमा झाल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना चाहत्यांनी मजा घेतली. वॉर्नरने उपांत्य फेरीत 30 चेंडूत 49 धावांची दमदार खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान कांगारू सलामीवीराने तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले.

याच सात धावांमुळे पाकिस्तान संघ पराभूत झाल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे माजी पाकिस्तानी खेळाडुंच म्हणने आहे की, जर कधी एखाद्या गोलंदाजाच्या हातून चुकून चेंडू सुटला नाही किंवा फार वेळ लागला तर समोरील खेळाडूने खेळ भावना दाखवत त्या चेंडूवर फटका मारायचा नसतो. ते म्हणजे लहान लेकराच्या गोलंदाजीवर षटकार मारण्यासारख आहे.

जर वार्नरने चेंडू सोडला असता किंवा तो मागे गेला असता तर त्यात त्याने  आपली खेळाप्रतीची भावना जपली असती.असंही पाकिस्तानी दिग्गज खेळाडू म्हणाला.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात 22 धावांची गरज होतीपण मॅथ्यू वेडने स्फोटक फलंदाजी करत शाहीन आफ्रिदीच्या 19व्या षटकात सलग तीन षटकार मारून सामना संपवला. त्याच षटकात हसन अलीने वेडचा झेलही सोडला, जो अखेरच्या सामन्यात निर्णायक ठरला. तत्पूर्वी, मोहम्मद रिझवानच्या 67 धावा आणि फखर जमानच्या 55 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 4 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here