आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

लस नं घेतल्यामुळे मुरली विजयला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या संघातून बाहेर काढल्यात आलंय…!


भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे, एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या मुरली विजयला कोरोनाची लस न घेतल्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी संघात स्थान देण्यात आलं नाहीये . त्याला तामिळनाडू संघातून वगळण्यात आले आहे.

कोविड-19 मुळे क्रीडा क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. काही महिन्यांनंतर खेळ सुरू झाला परंतु या काळात खेळाडूंना बायो-बबलच्या अत्यंत कडक आणि सुरक्षित वर्तुळात राहावे लागत आहे. ज्यात राहून खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय

विलगीकरण दिवसांची संख्या कालांतराने कमी झाली असली तरीही  काही खेळाडू लसीकरण करून घेण्यास आणि स्वतःला बायोबबल मध्ये ठेवण्यास दिरंगाई करत आहेत.

new google

मुरली विजय

असंच काहीस टीम इंडियाचा कसोटी खेळाडू मुरली विजयसोबत घडलंय. 

अनेक वेळा सांगूनही लस नं घेतल्याने आणि बायोबबलचे नियम नं स्वीकारल्याने मुरली विजयची निवड केली गेली नाहीये.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत देशांतर्गत सामने खेळवले जात आहेत. ज्यात मुरली विजय तामिळनाडू संघाकडून खेळणार होता. पण आयत्या वेळी त्याची निवड रद्द करण्यात आलीय. ज्याला कारण कोरोनाच लसीकरण बनलंय.

बीसीसीआयचे म्हणणे आहे की टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी एक आठवडा आणि नंतर तो संघासोबत असेपर्यंत खेळाडूला बबलमध्ये असणे आवश्यक आहे. पण विजय यासाठी अजिबात तयार नव्हता त्यामुळे तामिळनाडूच्या निवडकर्त्यांनी त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघाबाहेर ठेवले.

तर निवडकर्त्यापैकी एकाचे म्हणने आहे कि विजयने स्वतःच लस नाही घेतल्यास  निवड होणार नाही हा नियम ऐकून स्पर्धेतून माघार घेतलीय.

निवडकर्त्यांनी निवड बैठकीत त्याच्याशी चर्चाही केली नाही आणि सय्यद आली ट्रॉफीच्या हंगामापूर्वी त्याला तामिळनाडूच्या संभाव्य यादीतही स्थान मिळाले नाही. त्यामुळे जरी तो लस घेण्यास तयार असेल आणि त्याला परत यायचे असेल,तरी त्याची लगेच निवड होणार नाही म्हणून ही त्याच्यासाठी मोठी प्रक्रिया असेल. त्याला आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल आणि तामिळनाडूसाठी पुन्हा खेळण्यासाठी त्याला वाट पहावी लागणार आहे..


 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ?”

मॅक्युलमच्या मते विराट नाही तर हा फलंदाज आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वनचा कर्णधार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here