आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चक्क बुटातून बियर पीत आनंदोत्सव साजरा केलाय..!


टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मात देत ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरले. रंजकदार झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करत हा विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ड्रेसिंगरूम मध्ये आनंदोत्सव साजरा  करतांना दिसून आले.

हा  आनंदोत्सव साजरा करतानाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्या ऑस्त्रोलीयाचे काही खेळाडू चक्क बुटातून बिअर पितांना दिसत आहेत.

Watch: Australian players drink from shoe to celebrate T20 World Cup win, video goes viral

new google

मॅथ्यू वेड, फिंच आणि मार्कस स्टॉयनिस यांनी बूटामधून बियर पिली. याचा व्हिडीओ आयसीसीनं आपल्या ट्वीटरवर पोस्टही केलाय.

या व्हिडीओनंतर काही त्यांच्यावर टीकेची झोड उडाली.पण ऑस्ट्रेलियासाठी हे सेलिब्रेशन नवं नाही. गेल्या काही वर्षांपासून जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियातील खेळाडू असेच सेलिब्रेशन करतात. फॉर्मुला वनपासून क्रिकेटपर्यंत सर्व खेळाडू अशा प्रकारचं सेलिब्रेशन करतात.

नक्की काय आहे बुटातून बियर पिण्यामागच्या सेलेब्रेशनची त्यांची कहाणी?

बूटामध्ये बियर टाकून सेलिब्रेशन करतात त्याला शूई असं म्हटलं जातं. याची सुरुवात जर्मनीमध्ये 18 व्या शतकात झाली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियातही अशाच प्रकारच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. रियाल हॅरीस यानं V8 Utes स्पर्धेत सर्वात आधी शूई सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर अशाच प्रकारचं सेलिब्रेशन V8 सुपरकार स्पर्धा जिंकल्यानंतर  डेव्हिड रॅनल्ड्स यानं केलं. त्यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात अशाप्रकराच्या सेलिब्रेशनची लाट आली.

विश्वचषक

जॅक मिलर यानं केलेलं शूई सेलिब्रेशन चांगलेच चर्चेत राहिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला वन रेसर (F1)डॅनियल रिकियार्डो यानं या सेलिब्रेशन केलं. त्यानं केलेलं हे फेमस सेलिब्रेशन नंतर ऑस्ट्रेलियात चांगलेच गाजलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू असं सेलिब्रेशन करताना अनेकदा दिसले.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here