आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मोदिजींनी तिनही कृषी कायदे मागे घेत असल्याच सांगूनही शेतकरी नेते राकेश टिकैत आंदोलन माघे घेणार नाहीयेत..


गेल्या अनेक दिवसापासून सुधारित कृषी कायद्याविषयी जे आंदोलन सुरु होते त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आज मोदी मोदिजीनी आपण तिनही कृषी कायदे मागे घेणार असल्याच जाहीर केलय.

शेतकर्यांसमोर अखेर  सरकारला झुकाव लागल्याने सर्व जन आंदोलनातील शेतकरी बांधवांच आभिनंदन करताहेत..

काय होत नक्की प्रकरण?

new google

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.  शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत.  माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे.

कौन हैं किसान आंदोलन में नई जान फूंकने वाले राकेश टिकैत? | न्यूजबाइट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  देशात तीन कृषी कायदे आणले गेले होते या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही.

राकेश टिकैत

आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.

मोदिजींनी जरी कायदे मागे घ्यायचं जाहीर केलं असले तरी अद्याप आंदोलन थांबनार नाहीये..

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना याबद्दल विचारले असता त्यांनी  जाहीर केलं की आमचा केंद्र सरकारवर थोदासाही भरोसा राहिलेला नाहीये. जोपर्यंत संसदेत कृषी कायदे रद्द करण्याचा ठराव पास होऊन कायदे खरोखर रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याच त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात हे कायदे रद्द होणार कि आणखी काही प्रकारण घडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here