आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

क्रिकेटच्या सर्व फोर्मेटमध्ये शतक ठोकणारा सुरेश रैना पहिला भारतीय फलंदाज होता..!


भारतीय क्रिकेटने देशाला अनेक स्टार खेळाडू दिले. ज्यांनी आपल्या शैलीच्या जीवावर संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळवली. गावातील मैदानापासून ते परदेशातील मैदानावर अधिराज्य गाजवणाऱ्या अश्याच काही स्टार खेळाडूंपैकी एक म्हणजे सध्याचा चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना.

रैना हा त्याच्या काळात भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचा सर्वात मजबूत आधारस्तंभ मानला जातो. सुरेश रैनाचा जन्म उत्तर प्रदेशातील गाझियाबादजवळील मुरादनगर येथे झाला. सुरेश रैनाने 2005 साली भारतासाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून रैनाने भारतीय संघासाठी अनेक अप्रतिम खेळी खेळल्या आहेत.

सुरेश रैनाचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अविश्वसनीय आहे. तसेच त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत जे आजूनही तसेच आहेत.

new google

सुरेश रैना

सर्व फॉरमॅटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय

सुरेश रैना हा भारताचा असा पहिलाच खेळाडू आहे. ज्याच्या नावावर एकदिवसीय, ट्वेंटी-20 आणि कसोटीमध्ये शतके आहेत. इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 आणि ट्वेंटी-20 विश्वचषकात शतक झळकावणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे.

सुरेश रैनाने 2010 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्रास आयलेट (वेस्ट इंडीज) येथे 3 क्रमांकावर खेळताना आक्रमक 101 धावा केल्या. त्यादरम्यान रैनाने 60 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 5 आकाशी षटकार ठोकले. रैनाने आपल्या पहिल्या 50 धावा 42 चेंडूत केल्या तर शेवटच्या 50 धावा फक्त 18 चेंडूत पूर्ण केल्या. भारतीय संघाने हा सामना 14 धावांनी जिंकला होता.

सुरेश रैनाने २०१० साली श्रीलंकेविरुद्ध कोलंबोच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रैनाने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शतक झळकावले. त्यानंतर त्याने सामन्यात 120 धावा केल्या. एवढेच नाही तर या खेळीदरम्यान त्याने सचिन तेंडुलकरसोबत 246 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली.

भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा रैना हा भारताचा १२वा खेळाडू आहे. एवढेच नाही तर रैनाने रिकी पाँटिंगला बाद करून कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली होती.

सध्या रैना आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतो परंतु यावर्षी चेन्नई संघाने त्याला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता रैना सुद्धा आयपीएल 2022च्या मेगा ऑक्शनमध्ये समाविष्ट असणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here