आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

भारताचा पहिला कसोटी कर्णधार असलेल्या या खेळाडूने षटकार मारलेला चेंडू थेट दुसऱ्या शहरात जाऊन पडला होता..


क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये अनेक विक्रम  होतात पण ते कधीना कधी तुटतातच. तरीही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही असे स्टार  खेळाडू  होऊन गेले ज्यांनी त्यांच्या नावावर असा विक्रम नोंदवला जो आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही.  अश्याच काही खेळाडूपैकी एक म्हणजेच ‘कनकैय्या नायडू’. त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे जो अद्याप कोणीही मोडू शकलेलं नाहीये.

सध्याच्या काळात खेळाच्या स्वरूपातील बदलांमुळे आणि नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे चौकार-षटकार मारणे सोपे झाले आहे, पण जेव्हा क्रिकेट सुरू झाले तेव्हा तसे अजिबात नव्हते. क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा चौकार, षटकार मारणे हे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नव्हते पण अशा वेळी एका भारतीय फलंदाजाने आपल्या नावावर असा विक्रम केला आहे जो आजपर्यंत कधीही मोडू शकलेला नाही आणि हा विक्रम मोडण्याचीही शक्यताही नाही.

new google

कर्नल कोटारी कनकैय्या नायडू (सीके नायडू) जे भारताच्या पहिल्या कसोटीत कर्णधार होते त्यांनी भारतासाठी 7 कसोटी आणि 207 प्रथम-श्रेणी सामने खेळले, त्यांनी वयाच्या 69 व्या वर्षी शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला.

खेळाडू

त्यांच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीत त्यांनी 35 च्या सरासरीने 11825 धावाआणि 26 शतके ठोकली. आणि 411 विकेट्सही घेतल्या आहेत.

त्यांच्या पहिल्या सामन्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती पण तरीही  त्यांनी 40 धावा केल्या होत्या. ते इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक षटकार मारला होता जो त्यांच्या नावावर विक्रमी षटकार म्हणून नोंदवला गेला.

इंग्लंडच्या दौऱ्यावर असतांना फलंदाजी करतांना त्यांनी तो षटकार ठोकला जो थेट दुसऱ्या शहरात जाऊन पडला होता.

वर्वीकशेयर आणि व्रस्टेशेयर या दोन शहरांच्या सीमांच्या मध्ये फक्त एक नदी आडवी होती. हा चालू असलेला सामना  वर्वीकशेयरच्या  मैदानात सुरु होता जे मैदान नदीच्या काठावर होते. याच चालू सामन्यात त्यांनी मारलेला षटकार थेट नदी ओलांडत समोरील बाजूस असलेल्या व्रस्टेशेयर शहराच्या हद्दीत पडला आणि त्यांच्या नावावर एक अद्भुत असा विक्रम जमा झाला.

तसं पाहायला गेलं तर नदी ओलांडून षटकार ठोकणे सहसा शक्य वाटत नाही. परंतु हे सत्य आहे त्यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here