आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

रॉबिन उथप्पा: भारतीय संघाचा तो फलंदाज ज्याला भारतीय संघात संधी न मिळण्याच कारण महेंद्रसिंग धोनी असल्याचं बोललं जात.


कर्नाटकचा फलंदाज रॉबिन उथप्पा सध्या भारतीय संघाबाहेर आहे आणि तो सध्या राष्ट्रीय संघाच्या जवळ दिसत नाही. टी-ट्वेंटी क्रिकेटमधील त्याची क्षमता आणि विक्रम दर्शविते की रॉबिन उथप्पा हा भारताचा सर्वात दुर्दैवी टी-ट्वेंटी खेळाडू आहे.जेव्हापासून रॉबिन उथप्पाने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हापासून उथप्पा त्याच्या फटकेबाजीच्या क्षमतेने आणि भव्यतेने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता.

रॉबिन उथप्पाने कर्नाटककडून खेळताना 2913 धावा केल्या त्यानंतर उथप्पाने गौतम गंभीरसह आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी डावाची सुरुवात केली.

यादरम्यान उथप्पाने 47 च्या सरासरीने 660 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली इतकी चमकदार कामगिरी करूनही त्याला इंग्लंडविरुद्धच्या घरच्या टी-ट्वी मालिकेत संधी देण्यात आली नाही.

new google

रॉबिन उथप्पा

दुसरीकडे उथप्पाने चॅम्पियन्स लीगमध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी तो सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून उदयास आला. यावेळी रॉबिन उथप्पाला श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात एकदिवसीय मालिका खेळण्याची संधी मिळाली परंतु कर्णधाराने त्याला 6-7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले ज्यामुळे तो मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याला वगळण्यात आले.

IPL 2015 मध्ये उथप्पा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यानंतर त्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात स्थान देण्यात आले. एकदिवसीय मालिकेदरम्यान उथप्पा आपल्या प्रतिभेनुसार सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही परंतु उथप्पाने टी-ट्वेंटी मालिकेदरम्यान 39 आणि 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

रॉबिन उथप्पाने 198 टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये 29.41 च्या सरासरीने 5059 धावा केल्या आहेत ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 132.74 होता.

धोनी भारतीय संघात दाखल झाल्याने अनेक खेळाडूंना संधी मिळाली नाही त्यातील एक उथप्पा सुद्धा होता.कौशल्य असूनही त्याला संघात संधीच मिळाली नाही याचं कारण भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून धोनीची जागा फिक्स झाली होती. रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक ,पार्थिव पटेल यांसारख्या काही होतकरू यष्टीरक्षकांना धोनीच्या संघातील स्थानामुळे संधी मिळाली नाही.

टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये उथप्पा हा एक अतिशय आक्रमक फलंदाज तसेच एक मजबूत यष्टिरक्षक आहे.

एखाद्या खेळाडूचे केवळ त्याच्या कामगिरीवर नियंत्रण असू शकते. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून निवडकर्त्यांना प्रभावित करण्याचा उथप्पा पूर्ण प्रयत्न करेल.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here