आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

षटकारांचा पाउस पडणाऱ्या आयपीएल स्पर्धेत हे खेळाडू जास्त वेळा शून्यावर बाद झालेत..!

जगातील लोकप्रिय टी-ट्वेंटी लीग इंडियन प्रीमियर लीग 2022साठी सध्या संघ आपापले खेळाडू रीटेन करत आहेत. बाकी सर्व खेळाडू आयपीएल 2022च्या मेगा ऑक्शनमध्ये दिसतील ज्यांवर सर्व संघ मिळून बिली लावतील.

टी-ट्वेंटीचा खेळ नेहमीच फलंदाजांच्या बाजूने राहिला आहे. सुरेश रैना, रोहित शर्मा, ख्रिस गेल आणि विराट कोहली ही काही नावे आहेत जी आयपीएलच्या यशस्वी फलंदाजांमध्ये अव्वल आहेत. याशिवाय असे काही खेळाडू आहेत जे आयपीएलमधील अनेक वेळा शून्यावर बाद होऊन चर्चेत आले.

new google

या लेखात आम्ही आयपीएलमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत.  पाहूया कोणते आहेत ते खेळाडू.

रोहित शर्मा- 8: सध्याचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात डेक्कन चार्जर्सचा भाग होता शिवाय काही काळासाठी तो 2009 हैदराबादच्या आयपीएल विजेत्या संघाचाही एक भाग होता.

रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे ज्या दरम्यान रोहितने आपल्या बॅटने खूप धावा केल्या ज्यामुळे लवकरच संघ व्यवस्थापनाने त्याला संघाचा कर्णधार बनवले. आयपीएलमध्ये रोहितने आता 142 सामन्यांमध्ये 33.68 च्या सरासरीने 3874 धावा केल्या आहेत, यादरम्यान रोहित शर्मा 8 डावात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

जॅक कॅलिस – 9: दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिसचा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंमध्ये समावेश होतो. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात कॅलिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता त्यानंतर कॅलिसचा 2011 मध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये समावेश करण्यात आला.

कोलकाता नाईट रायडर्सकडून 4 हंगाम खेळल्यानंतर कॅलिसला 2015 मध्ये संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते. कॅलिसने आयपीएलमध्ये 28.55 च्या 2427 धावा केल्या याशिवाय कॅलिसने आयपीएलमध्ये 65 विकेट्सही घेतल्या आहेत. कॅलिस आयपीएलमध्ये 9 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

पार्थिव पटेल- १०: उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल शेवटच्या सामन्यावेळी  मुंबई इंडियन्सचा भाग होता मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यापूर्वी पार्थिव पटेल चेन्नई सुपर किंग्ज, डेक्कन चार्जर्स, कोची टस्कर्स केरळ, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएलमध्ये खेळला आहे.

आयपीएल

पार्थिव पटेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 6 वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी एकूण 103 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये पार्थिवने 21.17 च्या सरासरीने 1927 धावा केल्या आहेत,ज्या दरम्यान तो खाते न उघडता 10 वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. आयपीएल दरम्यान पार्थिवने यष्टिरक्षकाच्या भूमिकेत 54 झेल आणि 12 यष्टिचीत केले आहेत.

मनीष पांडे- 11: भारताचा युवा फलंदाज मनीष पांडे 2009 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या IPL दरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या मोसमात मनीषने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना शानदार शतक झळकावले आणि आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय होण्याचा मान त्याने आपल्या नावावर केला.

27 वर्षीय मनीष पांडे सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. केकेआरमध्ये सामील होण्यापूर्वी पांडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पुणे वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्सचा भाग होता. आयपीएलमध्ये मनीषने आतापर्यंत 89 सामन्यांमध्ये 25.98 च्या सरासरीने 1819 धावा केल्या आहेत यादरम्यान मनीष 11 वेळा शून्यावर बाद झाला आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here