आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

सुरु असलेला अंतरराष्ट्रीय लाइव्ह सामना एखादा खेळाडू चक्क गात असलेल्या गाण्याचे बोल विसरला म्हणून थांबवला गेला. असं तुम्हाला सांगितल तर विश्वास बसणार नाही. परंतु हा रंजक किस्सा घडलाय आणि तोही भारताच्या स्टार खेळाडूसोबत.

गोरेगाव स्पोर्ट्स क्लब प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटनप्रसंगी सेहवागने हा किस्सा सांगितला.

सेहवाग आधीपासून मैदानात फलंदाजी करतांना गाणे गुणगुणायचा हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. याबद्दल सेहवागने अनेक वेळा खुलासा ही केला आहे. गाण्याचे बोल विसरल्यामुळे सेहवागने  चक्क सामना  थांबवला होता.

new google

सेहवाग

ही गोष्ट 2008 सालची आहे चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात झंझावाती सलामीवीर सेहवागने त्रिशतक झळकावले होते. ज्यात सेहवागने फलंदाजी करतांना काही वेळासाठी सामना थांबवला होता.

सामन्याच्या नंतर बोलतांना सेहवाग म्हणाला, चेन्नई कसोटीत मी 300 धावांवर फलंदाजी करत होतो. तेव्हा मी गाण्याचे बोल विसरलो, म्हणून मी 12वा खेळाडू इशांत शर्माला मैदानात बोलावले आणि त्याला माझ्या iPod मधून गाण्याचे बोल काढण्यास सांगितले आणि इशांतनेही तसेच केले. ही घटना पाहून सगळ्यांना वाटू लागले की मी इशांत शर्माला ड्रिंक्ससाठी बोलावले आहे.

12व्या खेळाडूचा अशा प्रकारे कोणीही वापर करू शकतो याची कल्पनाही करता येणार नाही. वास्तविक ज्या गाण्याचे बोल सेहवाग विसरला होता ते गाणे होते ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘तू जाने ना’.

सर्वाना हेच वाटत होते की सेहवागने ड्रिंक्स किंवा काही साहित्य बदलण्यास सामना थांबवला असावा. पण नंतर समजलं की तो तर गाण्याचे बोल विसरला होता. ज्यामुळे त्याचे लक्ष फलंदाजीत लागत नव्हते. शिवाय फलंदाजी करतांना आपल आवडत गान गाणे हे सेहवाग त्याच्यासाठी चांगली गोष्ट   मानायचा.

एका जाहीर कार्यक्रमादरम्यान माजी सलामीवीर सेहवागला तुफानी गोलंदाज शोएब अख्तरचा सामना करताना कोणते गाणे गाणे आवडेल असे विचारण्यात आले. ज्यावर सेहवाग म्हणाला, ‘आ देखने जरा, किसमें कितना है दम’.

सेहवागला विचारण्यात आले की तुम्ही फलंदाजी करताना गाणे का गाता? यावर सेहवाग म्हणाला, बॉल खेळण्यापूर्वी मी विचार करतो की या चेंडूवर मी चौकार मारावा की षटकार? जास्त विचार टाळण्यासाठी आणि माझे लक्ष केंद्रित करण्यासाठी मी फलंदाजी करताना गाणे गातो.

आपल्या काळातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या सेहवागने आपल्या कारकिर्दीत 104 कसोटी सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने 8586 धावा केल्या, यादरम्यान सेहवागने 2 त्रिशतकेही झळकावली. सेहवागने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.

सेहवागचा हा किस्सा तुम्हाला आधी माहिती होता का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here