देशाला विश्वकप जिंकून देणारा हा गोलंदाज सध्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दुकान चालवतोय..!

====

गबरू हरभजन सिंहला मागे टाकत कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा रवी अश्विन तिसरा गोलंदाज बनलाय…!


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे खेळण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरलाय. मात्र, या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यातील अखेरच्या दिवशी अश्विननं टॉम लॅथमची विकेट घेऊन भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहचा विक्रम मोडीत काढलाय.

न्यूझीविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अश्विननं त्याच्या कारकिर्दीतील 418 वा विकेट्स मिळवलाय. या कामगिरीसह तो भारताकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरलाय. या यादीत हरभजन सिंह तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्या नावावर 417 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.

अश्विन

new google

त्यानं 103 कसोटी सामन्यात अशी कामगिरी करून दाखवली होती. मात्र, अश्विननं केवळ 80 व्या कसोटी सामन्यात 418 वा विकेट्स पटकावून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेंच्या नावावर आहे. त्यांनी 132 कसोटी सामन्यात 619 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर कपिल देव यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या नावावर 434 विकेट्सची नोंद आहे.

अश्विननं 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. त्यानं गोलंदाजीसह फलंदाजीत आपली जादू दाखवली आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2 हजार 85 धावा केल्या आहेत. ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. त्यानं भारतासाठी 111 एकदिवसीय सामन्यात 150 विकेट्स घेतले आहेत. तर, 51 टी-20 मध्ये 61 विकेट्स घेतले आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्या नंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here