देशाला विश्वकप जिंकून देणारा हा गोलंदाज सध्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दुकान चालवतोय..!

====

क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार असतांना या खेळाडूंनी सर्वांत जास्त षटकार लगावलेत.


सध्या क्रिकेट या खेळाची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे क्रिकेटच्या मैदानात खेळाडू षटकारांचा पाऊस पाडत आहेत आणि आज आम्ही तुम्हाला या विशेष लेखात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्या तीन कर्णधारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार असतांना सर्वाधिक षटकार ठोकलेत..

महेंद्रसिंग धोनी: भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी या कर्णधाराच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिले नाव आहे. महेंद्रसिंग धोनीने आपल्या फलंदाजीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. यामुळे तो जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानला जातो.

षटकार

new google

तो क्रिकेट जगतातील आणि भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 331 सामने खेळले असून त्यात त्याने 204 षटकार मारले आहेत.

रिकी पाँटिंग: ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक रिकी पाँटिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगनेही आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिंकून दिले. पाँटिंगने त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वचषक जिंकून दिला.

रिकी पाँटिंगने त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 324 सामन्यांमध्ये 171 षटकार ठोकले  ज्यामुळे तो एक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या स्थानावर आहे.

ब्रेंडन मॅक्क्युलम: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रेंडन मॅक्युलमने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट टेस्ट वनडे आणि टी-20 मध्ये 121 मॅचमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले ज्यामध्ये त्याने 170 सिक्स मारले.

तसे पाहता ब्रेंडन मॅक्क्युलमने महेंद्रसिंग धोनी आणि रिकी पाँटिंगपेक्षा खूपच कमी वेळ कर्णधारपणाचे काम केले आहे परंतु तरीही तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here