देशाला विश्वकप जिंकून देणारा हा गोलंदाज सध्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दुकान चालवतोय..!

====

अनेक हुशार पुरुष महिलांच्या यादीतून निवडून स्वतः मार्क झुकेरबर्गने या भारतीय महिलेस फेसबुक इंडियाची प्रमुख बनवलंय..


जगात क्वचितच असा कोणी असेल ज्याच्याकडे स्मार्ट फोन असेल आणि त्याच्याकडे फेसबुकचे अॅप नसेल. सगळे वाद आणि आरोप-प्रत्यारोप होऊनही लोकांमध्ये फेसबुकची क्रेझ कमी झालेली नाही. पण ही सोशल मीडिया नेटवर्किंग साइट चालवण्यामागे हजारो लोकांची टीम कार्यरत आहे. हे चेहरे कधी कोणीही पाहिले नाहीत आणि त्यांची नावेही ऐकली नाहीत.

पण जेव्हा फेसबुकवर कृतिगा रेड्डीचं नाव गाजले तेव्हा भारतच नाही तर संपूर्ण जगानं तिच्याकडे पाहिलं. कृतिगा रेड्डी ही भारतातील पहिली महिला आहे जिची फेसबुकने कंपनीच्या सर्वोच्च पदावर नियुक्ती केली होती.भारतात फेसबुकच्या वाढीमध्ये कृतिकाचा मोलाचा वाटा आहे.

फेसबुक

मात्र तिचा फेसबुकमधील हा प्रवास सोपा नव्हता. सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देत कृतिगाने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. आजच्या या लेखात जाणून घेऊया फेसबुकमध्ये काम करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेबद्दल..

जुलै 2010 मध्ये कृतिगा फेसबुक इंडियाची प्रमुख बनली. ही आणखी एक बाब आहे की या पदावर येण्यापूर्वी जगाला कृतिगाचे नाव अपरिचित होते पण तंत्रज्ञान आणि सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांना कृतिगाच्या प्रतिभेची नेहमीच जाणीव होती.

कृतिगाचा जन्म 1972 मध्ये चेन्नईमध्ये झाला. वडील सरकारी कर्मचारी होते आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने कृतिकाचेही पालनपोषण अगदी साध्या पद्धतीने झाले. पण याचा तिच्या विलक्षण प्रतिभेवर परिणाम झाला नाही. ज्या वयात मुलींना त्यांच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवायला आवडते त्या वयात कृतिगा डोकं पुस्तकात गुंतवून ठेवायची.

तिने मुंबईच्या महात्मा गांधी मिशन इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमधून संगणकशास्त्र पूर्ण केले. यानंतर तिने अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची पदवी मिळवली. यासोबतच सिराक्यूज युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात पुढील अभ्यास सुरू ठेवला.

फेसबुक

1995 पर्यंत सर्व पदव्या पूर्ण झाल्या त्यानंतर चांगली नोकरी करणे हे कृतिगाचे पुढील ध्येय होते. कृतिगाने तिच्या करिअरची सुरुवात सिलिकॉन ग्राफिक्समधून केली होती. जिथे तिने सतत 6 वर्षे काम केले.

हे कृतिगाचे गंतव्यस्थान कधीच नव्हते. अर्थात पगार चांगला होता आणि जॉब सिक्युरिटी सारखी व्यवस्था होती पण तिला तिचं करिअर इथेच थांबवायचं नव्हतं. नोकरीदरम्यानच कृतिगाच्या घरच्यांनी तिला लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली. तिला कुटुंबाच्या सुखाची काळजी होती पण अट एकच होती की तिला तिच्या करिअरला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबाचा सहवास हवा होता. देव म्हणून कृतिगाचे हे स्वप्नही पूर्ण झाले. पती-पत्नी दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले.

यादरम्यान कृतिगाने मोटोरोला, गुड टेक्नॉलॉजी, फोनेक्स टेक्नॉलॉजी यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये टीम लीडर म्हणून काम केले. तिचे कौशल्य पाहून फेसबुकने तिला नोकरीची ऑफर दिली. तीही छोटी जबाबदारी नाही तर भारतात फेसबुकचा मेन लीडर बनण्याची ऑफर  दिली.

क्रितिगाने एका मुलाखतीत सांगितले होते की,जेव्हा तिला ही जबाबदारी देण्यात आली तेव्हा अनेक पुरुषांची नावे यादीत समाविष्ट होती ज्यांना क्रॉस करून क्रितिगाच्या नावावर शिक्का मारला होता. अनेकांनी तिच्यावर टीका केली आणि असेही म्हटले की एक महिला संपूर्ण देशाची जबाबदारी घेऊ शकत नाही.

कृतिगाच्या नावावर खुद्द फेसबुकचे सीईओ मार्क झुगरबर्क यांनीच शिक्का मारला होता त्यामुळे तिला उघडपणे विरोध करणे कोणालाही शक्य नव्हते. असे असतानाही कृतिगाला कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

कृतिगाने तिची मेहनत सुरूच ठेवली आणि 2011 मध्ये जगातील 50 शक्तिशाली महिलांमध्ये आपले स्थान निर्माण केले. जेव्हा कृतिगाने भारतात तिची जबाबदारी स्वीकारली तेव्हा फेसबुककडे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मऐवजी व्यावसायिक लक्ष्य म्हणून पाहिले जाऊ लागले. मोठमोठ्या ब्रँड्सशी जोडून घेणे हा त्यांचा उद्देश होता.

कृतिगाने हे काम अतिशय चोखपणे पार पाडले. परिणामी 2013 सालापर्यंत फेसबुक हे प्रसिद्ध कंपन्यांसाठी तसेच स्टार्टअप्ससाठी जाहिरातीचे माध्यम बनले. त्यामुळे फेसबुकला आर्थिकदृष्ट्या भरपूर नफा झाला.

कृतिगाने तिच्या एका मुलाखतीत नोकरीच्या सुरवातीचा एक मजेशीर किस्सा शेअर केला होता. तो असा…

तिच्या आयुष्यातील हा मजेदार किस्सा शेअर करताना तिने सांगितले की जेव्हा ती भारतात पोहोचली आणि ऑफिसच्या पहिल्या दिवशी वेळेवर ऑफिसला पोहोचली तेव्हा तिला वॉचमनशिवाय दुसरे कोणीही नाही असे दिसले. आणि कृतिगाला  स्वतः कार्यालयाचे शेटर उघडावे लागले होते.

आपल्या आत्मविश्वासाच्या जीवावर यशस्वी होणारी कृतिगा रेड्डी ही स्त्रियांसाठी  खरंच एक उदाहरण आहे, खासकरून त्या महिलांसाठी ज्या आव्हानांना संधींमध्ये बदलू शकत नाहीत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्या नंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here