देशाला विश्वकप जिंकून देणारा हा गोलंदाज सध्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दुकान चालवतोय..!

====

देशाला विश्वकप जिंकून देणारा हा गोलंदाज सध्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दुकान चालवतोय..!


खेळाडूंच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या खेळाच्या जोरावर पैसा येत राहतो. खेळताना खेळाडू भरपूर कमाई करत राहतात मात्र या खेळाडूंना खेळापासून दूर राहिल्यानंतर पैशासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. खेळांमध्ये खेळाडू आपली उपजीविका करण्यासाठी पदके विकतात. क्रिकेटमध्येही असेच काहीसे घडते. जोपर्यंत क्रिकेटपटू मैदानात असतो तोपर्यंत चांदी राहते पण क्रिकेटपासून दूर होताच पैशाचीअडचण निर्माण होण्यास सुरवात होते.

क्रिकेटच्या खेळात असे खेळाडू क्वचितच पाहायला मिळतात की त्यांना घर चालवण्यासाठीही संघर्ष करावा लागतो पण असाच काहीसा प्रकार श्रीलंकेचा सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज उपुल चंदनासोबत घडला आहे… श्रीलंकेच्या संघातील मुख्य फिरकी गोलंदाज उपुल चंदनाला पैशांअभावी दुकान चालवावं लागतं आहे.

गोलंदाज

new google

उपुल चंदना हा एकेकाळी श्रीलंकेच्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानला जात असे. उपुल चंदना हा 1996 मध्ये श्रीलंकेच्या विश्वविजेत्या संघाचा भाग होता परंतु तो सध्या आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दुकान चालवत आहे.

उपुल चंदना सध्या क्रीडा साहित्याचे दुकान चालवत आहे. उपुल चंदनाचे हे दुकान कोलंबो नॉनडेस्क्रिप्ट क्रिकेट क्लबजवळ आहे. उपुल चंदनाच्या या दुकानाचे नाव चंदना क्रिकेट शॉप आह, या दुकानात क्रिकेटशी संबंधित वस्तू मिळतात.

उपुल चंदना सध्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुकान चालवत आहेत, पण एक काळ असा होता की उपुल चंदना श्रीलंकेच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. चंदनाने आपल्या कारकिर्दीत 16 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 37 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये चंदनाने 3 वेळा 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत तर चंदनाने 147 एकदिवसीय सामने खेळले ज्यात 151 विकेट्स घेण्यात यश मिळवले. तसेच गोलंदाजी सोबतच उपुल चंदनासोबत खालच्या फळीतही उपयुक्त फलंदाजी केली ज्यामुळे श्रीलंका संघ अधिकच मजबूत झाला होता.

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो आपलं आणि परिवाराचे पोट भरण्यासाठी स्वाभिमानाने दुकान चालवतोय.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here