आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारताचा हा माजी फलंदाज आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद झाला नव्हता..!


क्रिकेटच्या इतिहासात फलंदाज शून्यावर बाद होणे ही अत्यंत वाईट बाब समजल्या जाते. कोणताही फलंदाज आपण शून्यावर बाद व्हाव असा कधी विचारही करू शकत नाही. परंतु कधीना कधी ते एकदा तरी शून्यावर बाद होतातच.

सचिनपासून विराटपर्यंत सर्व खेळाडू अनेकवेळा शून्यावर आऊट झाले पण आज आपण अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत जो कधीही शून्यावर आऊट झाला नाही. हा खेळाडू परदेशी नसून आपल्याच देशाचा असून त्याने भारताला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आम्ही बोलत आहोत ते म्हणजे भारताचा माजी फलंदाज “यशपाल वर्मा”बद्दल.

फलंदाज

भारताचा माजी फलंदाज यशपाल शर्मा एकमेव असा खेळाडू आहे जो कधीही शून्यावर बाद झाला नाही. कधीही शून्यावर बाद न होणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे. 7 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या या फलंदाजाने 42 एकदिवसीय सामन्यांच्या 40 डावांमध्ये 883 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 अर्धशतकेही झळकावली होती.

तर कसोटी सामन्यांमध्ये त्याने 37 सामन्यांच्या 59 डावांमध्ये दोन शतके आणि 9 अर्धशतकांसह 1606 धावा केल्या. एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला कोणीही शून्यावर बाद करू शकले नाही.

1983 च्या विश्वचषकात भारताच्या विजयामागे यशपाल शर्माचा मोलाचा वाटा होता. या स्पर्धेत यशपालने 240 धावा केल्या होत्या. या खेळाडूने खेळलेल्या खेळीमुळे भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला. यशपाल शर्माने 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर हा काळ त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता.

1983 चा विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघावर एक चित्रपट बनवला जात आहे ज्याची निर्मिती कबीर खान यांनी केली आहे.

या ’83’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

खेळाडूंच्या पात्रांची निवड करण्याबाबत कपिल देव यांनी कबीर खान यांना सांगितले की या चित्रपटासाठी पात्र शोधणे खूप कठीण काम असेल. कपिलने कबीरला सांगितले की भारतात परफेक्ट कॅरेक्टर शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल कारण माझ्या टीममध्ये प्रत्येकजण एकापेक्षा जास्त होता त्यामुळे हे खूप कठीण काम असणार आहे.

यशपाल शर्माची क्रिकेट कारकीर्द तेवढीच यशस्वी राहिली होती..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

राजस्थानच्या या गावात शेतकरी शेती नाही तर अभिनय करतात..!

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here