आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

====

इंग्लंडच्या या स्फोटक सलामीवीर फलंदाजाने एका षटकात तब्बल 55 धावा काढल्या होत्या…


क्रिकेटच्या मैदानात कधी कधी शक्य वाटत नाहीत असेही विक्रम होऊन जातात. जे यापूर्वीही झाले आहेत. अनेक युवा खेळाडूंनी आपला असा वेगळा विक्रम तयार केला आहे. आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाइटवर क्रिकेट बद्दलचे काही रंजक किस्से नेहमीच शेअर करत आलो आहोत.आजही क्रिकेटच्या इतिहासातील असाच काहीसा रंजक किस्सा आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एक असाही फलंदाज आहे ज्याने एका षटकात चक्क 55धावा काढल्या होत्या. होय वाचून सहसा विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे.  अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे तो म्हणजे “अॅलेक्स हेल्स”.

धावा

new google

वयाच्या 16 व्या वर्षी अॅलेक्स हेल्सने एका षटकात 55 धावा काढल्या होत्या. 2005 मध्ये अॅलेक्स हेल्सने लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट आयडॉल T-20 स्पर्धेत हा पराक्रम केला होता.

अ‍ॅलेक्स हेल्सने एका षटकात ५५ धावा कशा काढल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं होत की, आयडॉल T20 स्पर्धेत जेव्हा अॅलेक्स हेल्स लॉर्ड्सच्या मैदानावर एका षटकाचा सामना करत होता तेव्हा गोलंदाजाने या षटकात 3 नो बॉल फेकले आणि या तीन नो बॉलचा फायदा घेत अॅलेक्स हेल्सने एकूण 8 षटकार आणि 1 चौकार ठोकले. आणि अशा प्रकारे त्याने एका षटकात एकूण 55 धावा केल्या.

IPL 2018 मध्ये हैदराबादकडून खेळताना दिसला होता हेल्स.

इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अॅलेक्स हेल्स आयपीएल 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसला होता. बॉल टॅम्परिंगचा आरोप असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या जागी सनरायझर्स हैदराबादने त्याला संघात घेतले होते . सनरायझर्स हैदराबादने त्याला त्याच्या मूळ किंमत एक कोटीमध्ये खरेदी केले आहे.

अॅलेक्स हेल्सची आतापर्यंतची क्रिकेट आकडेवारी उत्कृष्ट आहे.त्याने इंग्लंड संघासाठी 11 कसोटी सामने, 59 एकदिवसीय सामने आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इंग्लंडसाठी अॅलेक्स हेल्सने 11 कसोटीत 27.29 च्या सरासरीने 573 धावा केल्या आहेत. त्याने 59 एकदिवसीय सामन्यांमध्ये 36.69 च्या सरासरीने 2018 धावा केल्या आहेत.

अॅलेक्स हेल्सची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीही उत्कृष्ट आहे आणि त्याने 52 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 31.65 च्या सरासरीने आणि 136.33 च्या स्ट्राइक रेटने 1456 धावा केल्या आहेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्या नंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here