देशाला विश्वकप जिंकून देणारा हा गोलंदाज सध्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दुकान चालवतोय..!

====

जागतिक क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार या भारतीय फलंदाजांनी ठोकलेत…


क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकार मारणाऱ्या खेळाडूंना सर्वांत जास्त प्रभावशाली मानले जाते. प्रत्येक परिस्थिती षटकार चौकार मारण्यास सक्षम असणाऱ्या फलंदाजांना संघात जास्त संधी दिल्या जातात. क्रिकेटच्या एका वार्षिक खेळामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर षटकार ठोकलेत.  परंतु आज आम्ही तुम्हाला एका वर्षात सर्वांत जास्त षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांविषयी संगनार आहोत.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी पाहिली तर केवळ हिटमॅन रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. चला आज आम्ही तुम्हाला अशा भारतीय फलंदाजांची यादी सांगणार आहोत, ज्यांनी भारतीय संघासाठी कोणत्याही एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.

षटकार

new google

रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा जगप्रसिद्ध फलंदाज आणि हिटमॅन रोहित शर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्येआहे. याचा जिवंत पुरावा श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने असाधारण फलंदाजी करताना ठोकलेले द्विशतक आहे.

यादरम्यान त्याने अवघ्या 153 चेंडूत 13 चौकार आणि 12 षटकारांसह 208 धावांची जबरदस्त खेळी खेळली. यासह तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 45 षटकार मारून एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू बनला आहे.

सचिन तेंडुलकर: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून विरोधी संघाच्या गोलंदाजांवर मात करण्यात माहीर असलेल्या या माजी भारतीय खेळाडूने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत.

त्याचा षटकार मारण्याचा विक्रम पाहिला तर १९९८ साली भारतीय संघाने एकूण ४० षटकार मारून या यादीत आपले नाव दुसऱ्या क्रमांकावर ठेवले होते.

 सौरव गांगुली: माजी डावखुरा भारतीय फलंदाज आणि कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत जबरदस्त फलंदाजी करताना अनेक प्रसंगी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गगनचुंबी षटकार मारण्यात अत्यंत निष्णात मानल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीने 2000 साली जबरदस्त षटकार ठोकले होते. यादरम्यान त्याने 35 षटकार मारले आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा खेळाडू ठरला.

 महेंद्रसिंग धोनी: जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हटला जाणारा महेंद्रसिंग धोनी लाँग सिक्सर मारण्यात तज्ञ मानला जातो. 2005 या वर्षात माहीने आपल्या शानदार फलंदाजीच्या कामगिरीने 34 षटकार मारले आणि भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय इतिहासात एकाच वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत स्वतःला चौथ्या क्रमांकावर स्थापित केले.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्या नंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here