आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

====

आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी या चार खेळाडूंना आरसीबी संघामध्ये कायम ठेवू शकते..


इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आतापर्यंत 14 हंगाम खेळले गेले आहेत, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराट बंगळुरू संघात सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असूनही तो त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. आता चाहत्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात पुढील हंगामात अनेक बदल पाहायला मिळतील. नवीन हंगामापूर्वी बंगळुरू काही खेळाडूंना कायम ठेवणार आहे.

ज्यामध्ये गेल्या अनेक हंगामात कर्णधार म्हणून दिसलेला विराट कोहली या भूमिकेत दिसणार नाही.  तर एबी डिव्हिलियर्सच्या क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याची बॅट ताकद दाखवणार नाही.

अशा परिस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुढील हंगामाच्या मेगा लिलावात जाण्यापूर्वी कोणत्या 4 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

new google

आयपीएल

 युझवेंद्र चहल: लेगस्पिनर म्हणून युझवेंद्र चहलचा सध्याचा फॉर्म जरी फारसा दिसत नव्हता. पण तो एक सामना विजेता खेळाडू आहे जो गेल्या अनेक हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी आपले काम चोख बजावताना दिसत आहे. युझवेंद्र चहलला कायम ठेवण्याबाबत साशंकता आहे, मात्र आरसीबी संघ त्याला आपल्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेईल, अशी आशा सर्वांना आहे.

 हर्षल पटेल: आयपीएल 2021 च्या मोसमात आपल्या चेंडूने अप्रतिम कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलची कायम राखणे जवळपास निश्चित आहे. हर्षलने या फॉरमॅटमध्ये मॅचविनिंग गोलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केले. याच कारणामुळे त्याला भारतीय संघासोबतही खेळण्याची संधी मिळाली, त्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पटेलला सोडणे परवडणारे नाही.

  ग्लेन मॅक्सवेल: एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर ग्लेन मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा परदेशी खेळाडू म्हणून कायम ठेवण्याचा पर्याय पूर्णपणे खुला आहे. या स्फोटक खेळाडूने गेल्या आयपीएल हंगामात अशाच काही चमकदार खेळी खेळल्या, ज्यात बंगळुरू संघाने एकतर्फी विजय मिळवला.

 विराट कोहली: जरी विराट कोहली पुढील आयपीएल मोसमापासून कर्णधार म्हणून खेळणार नसला तरी पण जोपर्यंत तो आयपीएलमध्ये खेळतो तोपर्यंत तो केवळ बंगळुरू संघाकडूनच खेळताना दिसणार असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते. मात्र बंगळुरू फ्रँचायझी त्याला किती कोटींमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेते हे पाहणे रंजक ठरेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्या नंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here