आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

====

धडावेगळे झालेले स्वतःचे मस्तक तळहातावर घेऊन मुघलांशी लढला होता हा शीख यौद्धा….


पंजाबच्या भूमीने असंख्य योद्ध्यांना जन्म दिला आहे. पंजाबच्या इतिहासात असे अनेक योद्धे तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांच्या शौर्याच्या कहाण्या जगभर प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका शीख योद्ध्याबद्दलजाणून घेणार आहोत ज्यांच्या शौर्याची कहाणी ऐकून कोणाचेही डोके त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे. त्यांच्या नावाने शत्रू थरथर कापत असत.

इतिहासातील तो एकमेव असा शूर योद्धा होता, जो आपल शीर हातावर घेऊन लढत राहिला होता..

आम्ही शीख इतिहासातील महान योद्धा बाबा दीप सिंह जी यांच्याबद्दल बोलत आहोत. युद्धादरम्यान बाबा दीप सिंहजी यांनी दाखवलेले शौर्य आणि धैर्याने विरोधी सैन्यांनी त्यांच्यापुढे गुढघे टेकले होते.

new google

कोण होते बाबा दीप सिंहजी?

बाबा दीप सिंहजी यांचे आई-वडील भाई भगतू आणि माता जिओनी जी अमृतसरच्या पहुविंद गावात राहत होते. भाई भगतू हे शेतीचे काम करायचे. सर्व काही सुरळीत सुरु होत पण त्यांना मूलबाळ झाले नाही त्यामुळे त्यांच्या आयुष्यात संतानसुख मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत. एके दिवशी ते एका संत महात्माला भेटले त्यांनी त्याला सांगितले की त्याच्या पोटी एक अतिशय हुशार मुलगा जन्माला येईल आणि त्याचे नाव दीप ठेवा.

काही काळानंतर बाबा दीप सिंह जी यांचा जन्म २६ जानेवारी १६८२ रोजी झाला. एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांनी दीप सिंगला खूप लाडात वाढवले.

जेव्हा दीप सिंग 12 चे झाले तेव्हा त्यांचे पालक त्यालाआनंदपूर साहिब येथे घेऊन गेले. जिथे ते पहिल्यांदा शिखांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांना भेटले. त्यानंतर दीप सिंह काही दिवस आई-वडिलांसोबत तिथेच राहिला आणि सेवा करू लागला.

काही दिवसांनंतर जेव्हा ते परत जाऊ लागले तेव्हा गुरु गोविंद सिंग जी यांनी दीप सिंगच्या पालकांना त्याला येथे सोडण्यास सांगितले. दीप सिंग आणि त्याच्या आई-वडिलांनी लगेच याला होकार दिला.

आनंदपूर साहिबमध्ये दीप सिंग जी यांनी गुरुजींच्या उपस्थितीत शीख तत्त्वज्ञान आणि गुरु ग्रंथ साहिबचे ज्ञान प्राप्त केले.

त्यांनी गुरुमुखी तसेच इतर अनेक भाषा शिकल्या. खुद्द गुरु गोविंद सिंग जी यांनी त्यांना घोडेस्वारी, शिकार आणि शस्त्रे शिकवली. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी वैशाखीच्या पवित्र मुहूर्तावर गुरुजींच्या हातून शपथ घेतली आणि शीख सदैव सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली.

यानंतर गुरुजींच्या आज्ञेनुसार बाबा दीप सिंहजी आपल्या गावी पहुविंदला आपल्या पालकांकडे परत आले.

मस्तक

एके दिवशी गुरूजींचा एक सेवक बाबा दीप सिंग जी यांच्याकडे आला त्याने सांगितले की गुरुजींनी हिंदू टेकड्यांवरील राजांशी लढण्यासाठी आनंदपूर साहिबचा किल्ला सोडला होता. या युद्धामुळे गुरुजींची आई माता गुजरी आणि त्यांचे ४ पुत्रही इकडे-तिकडे विभक्त झाले आहेत.

हे कळताच बाबा दीप सिंह जी लगेच गुरुजींना भेटायला निघाले. काही काळानंतर बाबा दीप सिंग आणि गुरुजी यांची शेवटी तलवंडीतील दमदमा साहिब येथे भेट झाली. येथे पोहोचल्यावर बाबा दीप सिंह जी यांना कळले की गुरूजींचे दोन पुत्र अजित सिंह आणि जुझार सिंह हे चमकौरच्या युद्धात शहीद झाले होते आणि त्यांचे दोन धाकटे पुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांची सरहिंदमध्ये वजीर खानने निर्घृण हत्या केली होती.

त्यांच्या जाण्याआधी गुरु गोविंद सिंग जी यांनी गुरु ग्रंथ साहिब पूर्ण केले आणि ते बाबा दीप सिंह जी यांच्याकडे सुपूर्द केले आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी दिली. बाबा दीप सिंह जी यांनी पुन्हा गुरु ग्रंथ साहिबमधील सर्व शब्द आणि शिकवणी स्वतःच्या हाताने लिहून गुरु ग्रंथ साहिबच्या 5 प्रती तयार केल्या.

यातील एक प्रत श्री अकाल तख्त साहिब एक श्री तख्त पटना साहिब श्री तख्त हजूर साहिब आणि श्री तख्त आनंदपूर साहिब यांना पाठवण्यात आली होती. याशिवाय बाबा दीप सिंहजींनी अरबी भाषेत एक प्रत बनवली जी त्यांनी मध्यपूर्वेत पाठवली.

यामुळे 1757 मध्ये अब्दालीचा सेनापती जहांखान हरिमंदिर साहिब नष्ट करण्यासाठी सैन्यासह अमृतसरला पोहोचला.

हरिमंदिर साहिबचे रक्षण करताना अनेक शीख सैनिक मारले गेले. त्याच वेळी बाबा दीप सिंह दमदमा साहिबमध्ये होते. या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सैन्यासह अमृतसरच्या दिशेने कूच केले.

या युद्धाच्या वेळी ते 75 वर्षांचे होते. अमृतसर सीमेवर पोहोचल्यावर बाब दीप सिंग जी यांनी सर्व शीखांना सांगितले की, फक्त त्या शीखांनीच ही सीमा ओलांडली पाहिजे जे पंथाच्या मार्गात आपले डोके बलिदान देण्यास तयार आहेत. पंथाची हाक ऐकून सर्वजण उत्साहाने पुढे निघाले.

अखेरीस दोन्ही सैन्य गोहरवाल गावात आमनेसामने आले. युद्धाचा बिगुल वाजताच सैनिक रणांगणात उतरले.

युद्धात बाबा दीप सिंह आपल्या 15 किलो वजनाच्या तलवारीने शत्रूवर तुटून पडले. अचानक मुघल सेनापती जमाल खान बाबाजींच्या समोर उतरला. दोघांमध्ये बराच वेळ युद्ध सुरू होते. सरतेशेवटी दोघांनीही आपल्या तलवारी पूर्ण ताकदीने चालवल्या,त्यामुळे त्यांची दोन्ही डोकी धडापासून वेगळी झाली.

बाबाजींचे डोके खाली पडताना पाहून एका तरुण शीख सैनिकाने बाबाजींना ओरडून त्यांना त्यांच्या शपथेची आठवण करून दिली.यानंतर बाबा दीप सिंहजींचे धड एकदम उठले. त्यांनी आपले डोके उचलले आणि ते आपल्या तळहातावर ठेवले आणि आपल्या तलवारीने शत्रूंना मारत श्री हरिमंदिर साहिबकडे चालू लागले.

तळहातावर शीर घेऊन लढतांना बाबाजींना पाहून शिखांमध्ये उत्साह संचारला असताना शत्रू घाबरून पळू लागले.

अखेरीस बाबा दीप सिंह जी श्री हरिमंदिर साहिब येथे पोहोचले आणि परिक्रमेत आपले मस्तक अर्पण करून प्राण अर्पण केले.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्या नंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here