आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कोरोना हे एक षडयंत्र आहे म्हणत कालीचरण महाराजांनी WHOचा सुद्धा बाजार उठवलाय….!


जगभरात सध्या कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमिक्रॉन चर्चेचा विषय ठरतोय. दक्षिण आफ्रिकेतून पसरल्या जाणारा व्हायरस डेल्टा पेक्षाही खतरनाक असल्याचं म्हटल जातंय. सध्या भारतात जरी या व्हायरसचा शिरकाव झालेला नसला तरी केंद्र आणि राज्यशासन हव्या त्या उपाययोजना करून त्या व्हेरीयंटला देशाच्या बाहेर थोपवण्याच काम करत आहेत. अश्यातच आता भारतातील प्रसिद्धअसलेले कालीचरण महारज यांनी एक जावाईशोध लावलाय. कोरोना हे एक षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलय.

कालीचरण महाराज म्हणाले की,कोरोना हे एक षढयंत्र आहे. . इतकेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनाही फर्जीवाडा आहेअसा छातीठोक दावा त्यांनी केला. महाराज इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी चक्क WHO चा बाजार उठवायचा प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी सुद्धा फर्जी आहेत. आता बोला. या महारांजाबाबत प्रतिक्रिया तर द्यायची काय? हे त्यांचे शिष्यच सांगू शकतील.

कोरोना

new google

कालीचरण महाराजांनी येथून पुढे तर एकावर एक दावे केले. ते म्हणाले करोना ही भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू झाला त्या लोकांना डॉक्टरांनी मारले आहे. त्यांच्या शरीरातील किडनी आणि मानवी अवयवांची तस्करी झाली आहे, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला.

कालीचरण महाराज म्हणाले भारतातील प्रजेने ईश्वरनिष्ठ होऊन आयुर्वेदाचे उपचार घ्यावेत. सगळे कोरोने-फिरोने फेल होतील. कशाकाय यांना भविष्यवाण्या सूचतात हो. तिसरी लाट येऊन राह्यली आणि ही लाट येऊन राह्यली. त्यांच्या कंपन्या आहेत व्हॅक्सीनच्या. त्या तिसऱ्या लाटेच्या नावाखाली धडाधड व्हॅक्सीन बनवतात आणि त्या खपवतात. दुसरं काय हाय? हा कोरोना म्हणजे एक मोठे षढयंत्र आहे, असा दावा त्यांनी केला.

कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेचे लसीच्या कंपन्यासोबत संगणमत आहे. अमुक एक लस विकली गेली पाहिजे म्हणून ते भीती उत्पन्न करतात. लोकांना मारणे सुरू आहे. त्यांचे मृतदेह लपेटून टाकून दिले जात आहेत. त्यांच्या किडन्या काढल्या, हार्ट काढले, डोळे काढले काय माहित. लोकांना मारून फेकत आहेत. पुढचे सत्तर-ऐंशी वर्ष मजा करून घ्या. त्यानंतर हे लोक बारा हजार वर्षे नरकात सडतील असा दावाही त्यांनी केला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्या नंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here