आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलग 4चेंडूत चार गडी बाद करण्याचा विक्रम राशीद खानच्या नावावर आहे..


अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील बादशाह म्हणून ओळखला जाणारा राशिद खान आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये चार चेंडूत चार बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील अंतिम आणि तिसऱ्या सामन्यात त्याने हा विक्रम केला होता. राशिद खानने दुसऱ्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूत आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंमध्ये सलग विकेट घेत विश्वविक्रमाची नोंद केली होती. केविन ओब्रायन, जॉर्ज डॉकरेल, शेन गेटकेट आणि आयर्लंडच्या सिमी सिंग यांची विकेट घेत त्याने हा चमत्कार घडवला.

रशीदच्या पाच बळी आणि अष्टपैलू मोहम्मद नबीच्या 81 धावांच्या अर्धशतकांच्या जोरावर अफगाणिस्तानने तिसऱ्या सामन्यात 32 धावांनी विजय मिळवून मालिका 3-0 अशी खिशात घातली होती.

राशीद खान

new google

प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर,अफगाणिस्तानने 210 धावांची प्रचंड धावसंख्या उभारली ज्यासमोर आयर्लंडला 20 षटकात 8 बाद 178 धावाच करता आल्या होत्या.रशीद आशी कामगिरी करणारा पहिला ओलंदाज आहे.

राशिद खान व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार चेंडूत चार विकेट घेण्याचा विक्रम केवळ श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. 2007 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती.

आयर्लंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेणारा राशिद खान आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये जगातील ७वा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी ब्रेट ली, जेकब ओरम, टिम साऊदी, थिसारा परेरा, लसिथ मलिंगा, फहीम अश्रफ यांनी हॅटट्रिक घेण्याचा विक्रम केला आहे.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here