आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अजिंक्य रहाणेच्या जागी या तीनपैकी एका फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.


टीम इंडियाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंड मालीका ने जिंकली आहे आता काही दिवसांच्या विश्रांती नंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दोऱ्यावर रवाना होणार आहे मात्र या दोऱ्यापुर्वी निवडकर्ते काही मोठे निर्णय घेऊ शकतात वृतांवर विश्वास ठेवला तर अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपदावरून काढले जाऊ शकते.

रहाणे गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे यंदा त्याची सरासरी २० च्या खाली गेली आहे हे टीम इंडियासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे या खराब फॉर्म मुळे संघ व्यवस्थापन या खेळाडूला अंतिम अकरा मध्ये संधी देईल अशी अशा फारशी कमी आहे.

new google

तर काही युवा खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करून मधल्या फळीसाठ ावा करत आहेत चला तर मग आम्ही तुम्हाला या लेखात त्या खेळाडूबद्दल सांगू जे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अजिंक्य रहाणेची जागा घेऊ शकतात

सूर्यकुमार यादव: या यादीत पहिले नाव उजव्या हाताचा फलंदाज सूर्यकुमार यादवचे आहेत सूर्याला या वर्षीच्या सुरवातीला इंग्लडविरुद्ध अंतरराष्ट्रीय २०  सामन्यातपर्दापण करण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित केले त्याला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मध्ये पर्दापण करण्याची संधी मिळाली जिथे तो छाप पाडण्यात यशस्वी झाला. इंग्लंड दोऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत त्याच्या समावेश करण्यात आला हे त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे फळ आहे.

इंग्लंड दोऱ्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही तो भारतीय संघाचा भाग होता मात्र सूर्याला अद्याप कसोटी पर्दापणाची संधी मिळालेली नाही २०१० मध्ये प्रथम श्रेणी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमार यादवने एकूण ७७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत यादरम्यान त्याच्या बॅटने ४४. ०१ च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत

लाल चेंडूत त्याच्या नावावर १४ शतके आणि २६ अर्धशतके आहेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणेची जागा सूर्या घेऊ शकतो तो मधल्या फळीतील फलनदाज आहे आणि तो मुंबई आणि भारत संघासाठी सामना जिकणारा डाव ही खेळू शकतो.

हनुमा विहारी: या यादीत उजव्या हाताचा फलंदाज हनुमा विहारीचे नाव येते. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत विहारीचा समावेश करण्यात आला नव्हता पण दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या जागी मधल्या फळीतील काही खेळाडूंपैकी तो एक असू शकतो.

28 वर्षीय हनुमा विहारीने टीम इंडियासाठी 12 कसोटी सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने 33 च्या सरासरीने बॅटने एकूण 624 धावा केल्या आहेत. त्याने 21 डावात एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. अलीकडेच भारत अ साठी देखील, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या चार दिवसीय सामन्यात उत्कृष्ट खेळ दाखवला, पहिल्या डावात 54 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 72 धावा केल्या.

अजिंक्य रहाणे

नंबर-5 साठी हनुमा हा उत्तम पर्याय असू शकतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 55.31 आहे आणि त्याने 11 कसोटी सामन्यांमध्ये 34.11 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेच्या जागी हनुमा विहारी हा सर्वोत्तम पर्याय असेल.

श्रेयस अय्यर: या यादीत शेवटचे नाव श्रेयस अय्यरचे आहे, ज्याने न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत संस्मरणीय पदार्पण केले. अजिंक्य रहाणेच्या जागी अय्यर हा आघाडीचा दावेदार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याला पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण करताना त्याने पहिल्या डावात 105 धावा आणि दुसऱ्या डावात 65 धावा केल्या. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने चार डावात 50.50 च्या सरासरीने एकूण 202 धावा केल्या.

अय्यर संघाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो आणि खालच्या फळीसह उत्तम भागीदारी निर्माण करण्याची हातोटी आहे. श्रेयस अय्यरची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही सरासरी 53 आहे. त्याने यापूर्वीही मुंबई आणि भारत अ संघांसाठी अनेक वेळा मोठी खेळी खेळली आहे.


=

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here