आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मैक्सिकोमधील हा कुख्यात ड्रग्स माफिया जेलमधून पळून जाण्यात सगळ्यांचा बाप बनला होता..


आपण आजूबाजूला अनेक असे लोक बघत असतो जे कुठल्या ना कुठल्या बाबतीत एक पाऊल पुढेच असतात. आता आम्ही जर तुम्हाला असं सांगितलं की एल चे नावाचा हा माणूस एक दोन वेळा नाही तर तब्बल अनेक वेळा तुरुंगातून यशस्वीपणे फरार झाला आहे..तर??? तुम्ही म्हणाल की हे बोलणं खूप सोप्प आहे, पण करून दाखवणे अवघड आहे. पण एक व्यक्ती अशीही आहे जिने हे केवळ बोलून नाही तर ते करून दाखवलय.

मैक्सिको देश तेथील ड्रग्ज आणि ड्रग्ज माफियांसाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत या पृथ्वीतलावर आणखी एका कुख्यात ड्रग माफियाने जन्म घेतला होता…

https://assets.roar.media/Hindi/2018/02/Joaquin-Guzman-Story-of-Jailbreak-of-A-Mexican-drug-lord.jpg

new google

हा असा माणूस होता ज्याने पॉब्लो एस्कोबारनंतर, ड्रग्सच्या जगावर आपला धाक निर्माण केला आणि अमेरिकेच्या नाकी नऊ आले. हा ड्रग्स डीलर दुसरा तिसरा कुणी नसून ड्रग्सच्या जगातील गाजलेलं नाव  “एल चैपो” होता.

आत्तापर्यंत एल चे मेक्सिकोतील सर्वात सुरक्षित तुरुंगातून एकदा  नव्हे तर दोनदा सुटला  होता.

चला तर मग आजच्या युवाकट्टा विशेष लेखात जाणून घेऊया एल चैपोच्या तुरुंगातून पळून जाण्याची आणि पुन्हा हाती लागण्याची रंजक कहाणी.

जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारांपैकी एक असलेल्या या एल चैपोवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र अंमली पदार्थांच्या तस्करीच्या बाबतीत तो अतिशय हुशार मानला जातो. साधारण उंचीचा हा माणूस इतका हुशार आहे की त्याने मेक्सिको ते अमेरिकेपर्यंत बोगदा तयार करून अनेक वेळा ड्रग्जची तस्करी केली. त्याच्या या कारनाम्यामुळे, एल चैपोला 1993 मध्ये ग्वाटेमालामधून प्रथम पकडण्यात आले.

त्यावेळी एल चैपोला मेक्सिकन कोर्टाने 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. चैपो तुरुंगात गेल्याने सरकारने खरंतर सुटकेचा नि:श्वास सोडला होता .

आतापर्यंत सरकारला वाटत होते की एल चैपोची कहाणी इथेच संपली आहे पण तिथेच सरकार चुकले. किंबहुना, एल चैपो तुरुंगातूनही आपली टोळी चालवत होता याची कोणाला पुसटशी कल्पनाही नव्हती. तो आत बसून तुरुंगातील विकत घेता  येईल अशी  प्रत्येक व्यक्ती विकत घ्यायचा आणि जो कोणी नकार देईल त्याला धमक्या देतं असे.…याशिवाय त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत असे.

आकडेवारी नुसार बघायला गेलं तर जेव्हा तो पहिल्यांदा तुरुंगात होता तेव्हा त्याने 71 कर्मचारी खरेदी केले होते, जे तुरुंगातून पळून गेल्यानंतर पुन्हा सापडले होते.

19 जानेवारी 2001 ही ती तारीख होती ज्या दिवशी चैपो पहिल्यांदा तुरुंगातून पळून गेला होता. एल चैपोच्या सुटकेला  दुसऱ्या कोणी नाही तर खुद्द तुरुंगाच्या रक्षकाने  मदत केली .

चैपोला मुख्यतः चिएटो नावाच्या रक्षकाने पळून जाण्यात मदत केली होती. चीएटो घाणेरड्या कपड्यांची ट्रॉली घेऊन चैपोच्या खोली बाहेर आला आणि त्याने गुपचूप चैपोच्या सेलचा दरवाजा उघडला, एवढ्यात चैपो त्या कपड्यांच्या ट्रॉलीत बसून हॉलमधून पार्किंगच्या ठिकाणी पोहोचला. त्यावेळी तेथे  एकच गार्ड तैनात होता. याचा फायदा घेत त्याने सेव्हरलेट मॉन्टे कार्लो ट्रकमध्ये उडी मारली आणि तेथून पळ काढला.

रात्रीचा फायदा घेत एल चे तुरुंगातून बाहेर आला, पण आता त्याला शहरातून पळून जावे लागणार होते, म्हणून तो ट्रकमधून खाली उतरला आणि  पुढचा प्रवास त्याने एका गाडीतून केला. एका कारच्या डिकीत लपून त्याने शहर पार केले.

तुम्हांला हे जाणून आश्चर्य वाटेल की चैपोने हा  जेल मधून पळून जाण्याचा  कट  करण्यासाठी 2.5 दशलक्ष डॉलर्स खर्च केले होते. हा सर्व पैसा तुरुंग कर्मचाऱ्यांना लाच देण्यासाठी खर्च करण्यात आला.

अशा प्रकारे, चैपो 8 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर तुरुंगातून मोकळा श्वास घेतला. विशेष म्हणजे तुरुंगातून बाहेर येताच चैपो पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि धोकादायक बनला.

2003 मध्ये, मेक्सिकन डॉन आणि अमेरिकेच्या मते, एल चे जगातील सर्वात शक्तिशाली ड्रग्स माफिया बनला होता. तुरुंगातून फरार झाल्यानंतर 11 वर्षे एल चे असाच मुक्तपणे फिरत होता. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2014 रोजी एल पुन्हा पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांपासून पळून जाण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला, मात्र यावेळी त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यावेळी एका भुयारातून चैपोला पकडण्यात आले याच भुयारात, पकडले जाण्याच्या भीतीने चैपो अनेक दिवसांपासून लपून बसल्याचीही माहिती होती  पोलिसांपासून पळून जाण्याचा त्याचा प्रयत्नही फसला आणि पोलिसांनी त्याला पकडले.

ड्रग्स माफिया

11 जुलै 2015 ही तारीख मेक्सिकोसाठी ऐतिहासिक दिवस असणार होती. कारण या दिवशी चे पुन्हा दुसर्‍या उच्च सुरक्षा तुरुंगातून पळून गेला. यावेळी चेपोने सुटकेची नवी युक्ती आजमावली, त्याने भुयाराच्या मदतीने तुरुंगातून पळून जाण्याची योजना आखली आणि त्यात तो यशस्वीही झाला.

चापोला पळून जाण्यास मदत करणारे भुयार  त्याच्या सेलच्या बाथरूममधून  गेले  होते  आणि सुमारे एक मैल लांब होते . ते  इतके  मोठे आणि चांगले  बांधले  होते  की त्याच्या आत दुचाकीही जाऊ शकत होती . त्याचबरोबर प्रकाश, हवेचीही व्यवस्था त्यात करण्यात आली होती. चैपोसाठी भुयारही पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले होते .

हे भुयार एक मैल दूर असलेल्या घरापर्यंत पोचत होते . विशेष म्हणजे चाईपोचे लोक जेव्हा  भुयार  बनवत होते तेव्हा चुकून ते चैपोच्या शेजारी असलेल्या खोलीत पोहोचले, पण नंतर लवकरच त्यांनी ही चूक सुधारून हे भुयार बनवले . या जेल मधून पळून जाण्याच्या प्रकरणाने पुन्हा मेक्सिकोचे  साऱ्या जगासमोर हसे झाले .

यावेळी सरकार चैपोवर इतके चिडले की, चैपोची माहिती देणाऱ्याला ३.८ दशलक्ष डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणाही केली.दुस-यांदा त्याने मेक्सिको सरकारला चकमा दिला, पण यावेळी तो मोकळ्या हवेत जास्त वेळ श्वास घेऊ शकला नाही. त्यांनतर एका वर्षानंतरच जानेवारीत एल चेला पुन्हा पोलिसांनी पकडले.

तिथल्या सरकारची वारंवार फसवणूक केल्यामुळे आणि त्याचे गुंड मेक्सिकोमध्ये  होते त्यामुळे या धोकादायक गुन्हेगाराला तेथे ठेवण्यासाठी तेथे कोणतेही तुरुंग योग्य नव्हते. त्यामुळेच यावेळी पोलिसांनी चैपोला थेट अमेरिकेत पाठवले.

अंमली पदार्थांच्या तस्करीदरम्यान चेपोच्या मेक्सिकन सैन्यासोबत अनेक चकमकी झाल्या, अशाच एका चकमकीदरम्यान तो १७ ऑक्टोबर २०१५ रोजी जखमी झाला. तुरुंगातून पळून आल्यानंतर जेव्हा मेक्सिकोचे पोलीस, लष्कर, जवळपास सर्व सैन्यदल त्याचा शोध घेत होते तेव्हाही तो इतका निर्भय होता की त्याने एका अमेरिकन फिल्म स्टार सिन पेनला मुलाखतही दिली.

चैपो ने मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या जीवनावर चित्रपट बनवला जावा अशी त्याची इच्छा आहे.

मात्र आज त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, आणि त्याच्या जीवनावर एक नाही  तर अनेक चित्रपट बनले आहेत, परंतु तो  कधी ते पाहू शकणार नाही. कारण तो आता  तुरुंगातून बाहेर येणे शक्य नाही.  म्हणतात ना वाईट कामाचे फळ वाईटच मिळते.


=

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here