आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
या शिवभक्त साधूने आपला एक हात गेल्या 48 वर्षापासून वर करून ठेवलाय…
विश्वास आणि दृढ इच्छा या दोन अशा गोष्टी आहेत, ज्याच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो. मग
लोकांनी आपापल्या दृष्टिकोनातून योग्य -अयोग्य ते ठरवून काम केले तरी काही फरक पडत नाही. आज आम्ही
तुम्हाला ज्या व्यक्तीची कहाणी आपणास सांगणार आहोत जी याचे जिवंत उदाहरण आहे.
काही लोकांसाठी साधू हे विचित्र व्यक्ती आणि काहींसाठी रहस्यमय संन्यासी वाटते. एक माणूस ज्याने
आपल्या विश्वासाने आणि दृढ हेतूने जगाला थक्क केले आहे. तब्बल 48 वर्षांपासून ही व्यक्ती एक हात हवेत धरून
उभी आहे. पण त्याने असे का केले आणि कोणासाठी केले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
साधू होण्यापूर्वी तो एक सामान्य माणूस होता. आज अमर भारतीयांच्याकडे पाहणा-यांना असे वाटते की तो असाच
विलक्षण होता, पण तसे नाही. आधी तो एका बँकेत कामाला होता. त्याचे स्वतःचे कुटुंब होते परिवारात पत्नी आणि
तीन मुले पण होती. आयुष्यात सर्व काही ठीक होते. पण मग एके दिवशी अचानक त्यांने कुटुंब, नोकरी, मित्र-
नातेवाईक सोडून धार्मिक मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यानी आपले संपूर्ण आयुष्य भगवान
शिवाला समर्पित केले.

त्यानंतर अमर भारती यांना ते धर्म कार्य करण्याची दृढ़ इच्छा झाली होती जी साधूला करण्यास मनाई
झाली होती. पण अशा परिस्थितीत शिवाबद्दलची आपली धार्मिक श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी हवेत
एक हात उंचावून आयुष्यभर धरण्याचा निर्णय घेतला.
अमर भारतीला सुरुवातीच्या काळात प्रचंड वेदना झाल्या. सामान्य माणसाला अशा प्रकारे हात हवेत ऊँचावुन ५ मिनिटंही धरून ठेवणं शक्य नाही. पण त्यावेळी अमर भारतीने 1973 मध्ये हवेत आपला हात उंचावला तेव्हापासून आजतागायत त्यांनी हात खाली केला नाही.
सुरुवातीला हे सोपे नव्हते. त्याला खूप वेदना होत होत्या. पण त्याच्या दृढ़ इराद्यापुढे सर्व वेदना क्षीण झाल्या.
दोन वर्षांपर्यंत त्याच्या हाताला वेदना जाणवत होत्या,पण त्यानंतर हळूहळू हात इतका बधीर झाला की
त्यातून दुखण्याची जाणीव नाहीशी झाली. त्याच्या हाताला काहीच वेदना वाटत नव्हती. आज 48 वर्षे झाली
आणि त्याचा हात कायमचा हवेत राहिला.जे आता तो इच्छा असूनही खाली आणू शकत नाही. त्याच्या या
निर्णयामागे शिवभक्ती तर होतीच, पण दुसरा काही हेतूही होता.
अमर भारतीच्या या प्रबळ हेतूमागे शिवभक्ती होती हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्यांचा हेतू यापेक्षा
वेगळा पण होता. समाजहिताच्या भावनेतून जागृत होऊन त्यांनी हा निर्णय घेतला. यात शिवाबद्दल आदर तर होताच, पण त्याचबरोबर जागतिक शांतता आणि युद्धाविरुद्धची भावना होती. एका
मुलाखतीत स्वतः अमर भारती म्हणाले; “हम आपस में लड़ते क्यों हैं, हमारे बीच इतनी नफ़रत और दुश्मनी क्यों है? मैं चाहता हूं कि सभी भारतीय शांति से रहें. मैं चाहता हूँ की पूरी दुनिया शांति से रहे.”
आज संपूर्ण जग अमर भारतीला ओळखते. काही लोकांनी त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले. अमर भारती आजही हात पूर्वीप्रमाणेच हवेत धरून आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…
आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..
इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..
कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!
खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?
व्हिडीओ प्लेलीस्ट: