आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

चीनमध्ये लाखोंच्या संख्येने बसवण्यात आलेले ‘एआय-सीसीटीव्ही’ कॅमेरे आता चीनचा तिसरा डोळा ठरताहेत….!


तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनला नेहमीच जगाच्या पुढे धावतांना आपण आजपर्यंत पाहत आलोय. वेगवेगळे आणि चर्चात्मक शोध लावण्याचा हातखंडा असलेला चीन नेहमीच संशोधनावर लक्ष केंद्रित करत आलाय. चीन आता चेचत आलाय तो चीनमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे.

जिथे उर्वरित जग फोनमध्ये सेल्फी घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहे. दुसरीकडे चीन त्याचा वापर आपल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी करत आहे. चीनमध्ये सध्या जगातील सर्वात मोठी सीसीटीव्ही मॉनिटरिंग यंत्रणा बनली आहे. एका आकडेवारीनुसार चीनमध्ये सुमारे 170 दशलक्ष सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

एवढेच नाही तर आगामी काळात त्यात आणखी वाढ करायची आहे. 2020 पर्यंत चीनला आपल्या देशात सुमारे 400 ते 600 दशलक्ष सीसीटीव्ही बसवायचे आहेत.याद्वारे चीनला आपल्या देशाच्या प्रत्येक कोप-यावर लक्ष ठेवायचे आहे. AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांना या CCTV मॉनिटरिंगमध्ये सर्वात जास्त मदत करत आहे.

new google

चीन

एवढेच नाही तर हे कॅमेरे केवळ चेहराच तपासत नाहीत तर त्या व्यक्तीचे अंदाजे वयही शोधू शकतात. त्याच्या समोर जितके लोक जातील ते प्रत्येकाला त्याच्या डेटाबेसमध्ये संग्रहित करेल.

सध्या एआय(AI) सीसीटीव्हीची जबाबदारी चिनी पोलिसांकडे आहे. ते त्यांची गुन्हे प्रकरणे सोडवण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी याचा वापर करत आहेत. हे सर्व सीसीटीव्ही देशातील विविध नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहेत. जवळपास प्रत्येक नियंत्रण कक्षात देशातील प्रत्येक नागरिकाची माहिती असते.

चीनने आपल्या नागरिकांची माहिती फार पूर्वीच डिजीटल केली आहे. त्या हालचालीचा फायदा आता त्यांना मिळत आहे. प्रत्येक व्यक्तीचा फोटो, नाव, पत्ता, वाहन नोंदणी, गुन्हेगारी नोंद आदी बाबी पोलिसांच्या डेटाबेसमध्ये आधीच नोंदल्या जातात. एआय (AI) सीसीटीव्ही या सगळ्याचा फायदा घेतात.

चीनच्या या एआय (AI) सीसीटीव्ही कॅमे-याना केवळ त्यांचे सरकारीच नाही तर खासगी कंपन्याही सपोर्ट करत आहेत. ज्या सॉफ्टवेअरद्वारे कॅमेरे चेहरे ओळखू शकतात ते सेन्सटाइम नावाच्या कंपनीने तयार केले आहे. सुरुवातीच्या काळात केवळ चीन सरकारच यामध्ये पैसे गुंतवत होते. मात्र आता चीनची सर्वात मोठी रिटेलिंग वेबसाइट ‘अलिबाबा’ही त्याकडे आकर्षित झाली आहे.

असे मानले जाते की त्यांनी AI CCTV साठी $600 दशलक्ष निधी दिला आहे. या निधीनंतर, SenseTime चे मूल्य आता सुमारे $4.5 बिलियन झाले आहे. यामुळे, SenseTime आज जगातील सर्वात मोठा AI स्टार्टअप बनला आहे.

चीनमधील बहुतांश लोक डिजिटल जगाशी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत सरकारला लोकांची डिजिटल ओळख बनल्याने शासकीय कामे खूप सोपे होतात. असे मानले जाते की सरकार चिनी नागरिकांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवेल. कारण अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी लोकांना आयडीची ID गरज भासेल. कर्ज घ्यायचे असो कार घ्यायची असो, इंटरनेट कॅफेत जावे किंवा फिरायला जावे. अशा अनेक ठिकाणी हे आयडी तपासले जातील.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या  (AI) बाबतीत चीनने एक मोठे पाऊल उचलले आहे. इतर कोणत्याही देशाने आतापर्यंत त्याचा वापर करण्याचा विचार केला नव्हता. आता चीनचे हे पाऊल त्यांनाचांगलच उपयोगी पडतंय आणि येणाऱ्या काळात याचा आणखी फायदा होणार हे मात्र नक्की..!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here