आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आयपीएलच्या लिलावात 10 कोटीच्या वर बोली लागूनही हे खेळाडू मैदानात पुरते अपयशी ठरले होते..


क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग)स्पर्धा आता जगभर प्रसिद्ध झाली आहे. या स्पर्धेने अनेक खेळाडूंना नावलौकिक तर मिळवून दिलाच पण सोबतच  श्रीमंतीची द्वारही खुली केली.

पण याच आयपीएल मध्ये काही खेळाडू असेही होऊन गेले ज्यांनी पैसा तर कमावला पण मैदानात आपल नाव गाजवण्यास अपयशी ठरले. चला जाणून घेऊया त्या 3 भारतीय खेळाडूंबद्दल ज्यांना लिलावात 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली पण ते अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत.

Yuvraj Singh Picks 3 Cricketers Who Can Replicate His Performance In The Indian Team

new google

दिनेश कार्तिक: विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक २०१४ आणि २०१५ मध्ये टीम इंडियाचा नियमित सदस्य नव्हता. असे असतानाही अनुभवी उजव्या हाताच्या फलंदाजांना आयपीएलमध्ये मोठा करार मिळाला. कार्तिकला 2014 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) ने 12.5 कोटी रुपयांना खरेदी  केले होते. त्या मोसमात कार्तिकने समाधानकारक कामगिरी केली. त्याने दिल्लीसाठी 14 सामने खेळले ज्यात त्याने 325 धावा केल्या.

या कामगिरीनंतरही दिल्लीने कार्तिकला पुढच्या सत्रात कायम केले. कार्तिकने 2015 च्या लिलावात भाग घेतला होता. पुन्हा एकदा त्याच्यावर चांगली बोली लागली. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिनेश कार्तिकला १०.५ कोटींमध्ये करारबद्ध केले.

कार्तिक त्या मोसमात बंगळुरूच्या सर्व सामन्यांचा भाग होता पण त्याच्या बॅटने केवळ 141 धावाच करता आल्या. 2015 मध्ये कार्तिकची सरासरी 12.81 होती. याच कारणामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने दुसऱ्याच मोसमात कार्तिकला घरचा रस्ता दाखवला.

युवराज सिंग: ‘सिक्सर किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला युवराज सिंग रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने   10 कोटींहून अधिक रक्कम देऊन संघात सामील करून घेतले होते. युवराजसाठी 2014 हे वर्ष आरसीबीकडून चांगले गेले पण जेव्हा तो दिल्लीला गेला तेव्हा युवीला त्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.

आयपीएल

युवराजने आयपीएल 2014 मध्ये आरसीबीसाठी 14 सामन्यांमध्ये 376 धावा केल्या, ज्यात तीन वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने गोलंदाजीतही सुमार केली आणि 5 विकेट्सही घेतल्या. युवीची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 35 धावांत 4 बळी होते. जास्त पैसे मोजूनही समाधानकारक  कामगिरी ण केल्यामुळे दिल्लीनेही युवराजला घरचा रस्ता दाखवला.

जयदेव उनाडकट: आयपीएल 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला करारबद्ध केले, उनाडकटने 12 सामन्यांत 24 बळी घेत फ्रँचायझीच्या अपेक्षा पूर्ण केल्या. उनाडकटने 2018 मध्येही मागील कामगिरीची पुनरावृत्ती करावी अशी चाहत्यांची अपेक्षा होती.

IPL 2018 मध्य, राजस्थान रॉयल्सने 11.5 कोटी देऊन त्याला संघात सामील केले ही किंमत भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक किंमत होती. उनाडकटला 15 सामने खेळावे लागले आणि तो राजस्थान रॉयल्ससाठी केवळ 11 विकेट घेऊ शकला. यादरम्यान त्याने 9.65 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. मात्र राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. ज्यात उनाडकटचे योगदान काही विशेष नव्हते यानंतर त्याला संघातून मुक्त करण्यात आले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here