आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

शाश्त्रीजी म्हणताहेत, मी संघाचा प्रशिक्षक होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केलेत…


भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात  पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल  होताहेत. कर्णधार विराट कोहलीकडून ट्वेंटी- ट्वेंटी संघासह आता एकदिवशीय सामन्याचे कर्णधारपदही काढून घेण्यात आलय. भारतीय संघाचा नवा एकदिवशीय  कर्णधार आता  रोहित शर्मा झाला आहे. याआधी रोहितला ट्वेंटी- ट्वेंटी संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होत.

टीम इंडिया नेतृत्वात झालेले हे बदल पाहून माजी प्रशिक्षक रवी शास्त्री थोडे अचंबित झाले आहेत. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या समाप्तीनंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक बनला आहे, तर विराट कोहली आता T20 फॉर्मेटनंतर वनडेचा कर्णधार नाही.

विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडीने गेल्या काही वर्षांत जबरदस्त कामगिरी केली पण आता जिथे रवी शास्त्रीचा कार्यकाळ संपला आणि विराट कोहली फक्त नावाला उपकर्णधार उरलाय.

new google

याच पार्श्वभूमीवर शास्त्रीजींनी आता एक नवा खुलासा केला आहे.

शाश्त्री

ICC T20 विश्वचषक 2021 नंतरच रवी शास्त्रींचा कोचिंग कार्यकाळ संपला आणि आता राहुल द्रविड ही भूमिका निभावत आहे, पण दरम्यान माजी प्रशिक्षक रवी शास्त्री एकामागून एक खुलासे करत आहेत. काही लोकांना मी टीम इंडियाचा कोच होऊ नये यासाठी प्रयत्न केले असं शास्त्री म्हणालेत.

रवी शास्त्री यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी कुणाचेही नाव न घेता जबरदस्त हल्ला चढवला आहे. रवी शास्त्री यांनी काही लोकांना आपण प्रशिक्षकपदावर राहावे असे वाटत नव्हते तर दुसरीकडे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण हेही काही जनांना नको होते असा खुलासा त्यांनी केला.

शाश्त्रीजी एवढ्यावरच थांबलेले नाही तर त्यांनी पुन्हा म्हटलं की, माझ्या दुसर्‍या कार्यकाळात मी एका मोठ्या वादात अडकलो होतो आणि ज्यांना मला या जबाबदारीपासून दूर करायचे होते त्यांच्या चेहऱ्यावरती  ती गोष्ट स्पष्ट दिसत होती.  हे तेच लोक होते ज्यांना भरत अरुण कोचिंग स्टाफमध्ये सामील व्हायचे नव्हते.

मी भरत अरुणला गोलंदाजी प्रशिक्षक बनवावं अशी त्यांची इच्छाही नव्हती आणि आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा परिस्थिती कशी बदलली आहे त्यावरून समजते . गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नको असलेला माणूस आज चांगल्या ठिकाणी पोहचलाय.

त्यामुळे भारतीय संघाच्या आजूबाजूला असे काही लोक आहेतच ज्यांना मी प्रशिक्षक झालेला कधीही नकोच होते.असं शास्त्री म्हणालेत. मग आता नेमकी ही मंडळी कोणती? की शास्त्रीजी स्वतःच या गोष्टी फेकताहेत हा प्रश्न मात्र निरुत्तरितच राहणार आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here