आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पाडणारा हा सिरीयल किलर मुंबईचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जायचा..


आजपर्यंत आपण अनेक सिरीयल किलरच्या कहाण्या ऐकल्या असतील, चित्रपट पहिले असतील.ज्यातुन आपल्याला सिरीयल किलर कसा असतो याची माहिती तर आधीच झाली असेल त्यामुळे आम्ही आता सिरीयल किलर कसा असतो हे सांगत नाय बसणार. तर आज आम्ही तुम्हाला एका अश्या सिरीयल किलरची गोष्ट सांगणार आहोत ज्याला मुंबईचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जायचं.

तो अंधाऱ्या रात्रीत हातात शस्त्र घेऊन यायचा आणि लोकावर सपासप वार करत सुटायचा. मुंबईच्या लोकांमध्ये आपली दहशद निर्माण करणाऱ्या या सिरीयल किलरचं नाव होत ‘रमण राघव. त्याच्या क्रूरपनाच्या कहाण्या आजही अनेक ठिकाणी सांगितल्या जातात.

सिरीयल किलर

जवळपास 1966चे वर्ष असेल याकाळात त्याच्या क्रूर कामाला नेमकीच सुरवात झालेली. नेहमीप्रमाणे मुंबईतील जनजीवन न थांबता पूर्ण वेगाने चालू होते. प्रत्येकजण आपापसात मग्न होता पण मुंबईच्या फूटपाथवर कुणीतरी माणसं मारायला सुरवात केलीय याची खबरही कुणाला लागली नव्हती.

सुरुवातीला पोलिसांना शहरात खून झाल्याची खबर मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ते पाहून थक्क झाले. ज्याचा खून झाला होता त्याचा चेहरा ओळखण्यासारखा सुद्धा राहिला नव्हता. त्यामुळे मारेकरी कोण? शोधणे तर लांब आधी मेलाय कोण? हे शोधणे सुद्धा पोलिसांना अवघड होऊन बसले. अश्याच पद्धतीने आणखी काही खून मुंबईच्या रस्त्यावर झाले आणि पोलिसांचे धाबे दणाणले.

पोलिसांसमोर आता आरोपीला शोधण्याच आव्हान तर होतच पण त्यांच्यासमोर सर्वात मोठी अडचण ही होती की मारेकऱ्याला कोणी ओळखतही नव्हते. तो कोण होता आणि तो लोकांना का मारत होता हे कोणालाच माहीत नव्हते. तो कोणीही असो त्याच्या या कृत्याने मुंबईतील अनेक रस्ते रक्ताने माखले होते.

लोकांनी या सिरीयल किलरचा एवढा धसका बसला होता की लोक रात्री बाहेर निघण्यास सुद्धा घाबरत होते. त्याला पकडण्यासाठी लोकही आता पोलीसानांवर दबाव आणत होते.

जसे जसे दिवस जात होते तसे तसे मृत व्यक्तींची संख्या वाढत होती..मुंबईसारख्या मोठ्या शहरात पोलिसांना अज्ञात व्यक्ती शोधणे म्हणजे गवताच्या ढिगा-यात सुई शोधण्यासारखे होते.

कोणत्याही परिस्थितीत या नराधमाला पकडून म़ारणार, असा निर्धारही मुंबई पोलिसांचा होता. या एका माणसाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण मुंबई पोलीस शहरभर पसरले होते. रोज रात्री पोलीस मारेक-याच्या शोधात गुंतले होते. प्रत्येक काना -कोपऱ-यावर नजर होती पण तरीही खून होतच राहिले.

एवढ सगळ  करूनही खुनी पकडल्या जात नसल्यामुळे लोकांनी त्याच्याबद्दल अफवा पसरवायला सुरवात केली. कोणी खुनी हा भूत असल्याचं म्हणत होत तर कुणी हे एखाद्या सैतानाच काम असल्याचं बोलत होत. एवढच काय तर लोकांनी रमण राघव जादुई सैतान असल्याचे सांगितले, जो लोकांना मारल्यानंतर कोणत्याही प्राण्याचे रूप घेऊन पळून जात असे.

प्रत्यक्षात असे काही नव्हते पण पोलिसांच्या अपयशामुळे लोकांचा त्यावर विश्वास बसला. रामन यांनी अनेकांना मारण्याचा प्रयत्न केला पण त्यातील काही वाचले.

रमणच्या तावडीतून सुटलेल्या एकाने त्याचा चेहरा पाहिला होता आणि येथूनच त्याचे दिवस भरायला सुरवात झाली.

त्याच्या तावडीतून  सुटलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून खुन्याचं चित्र बनवण्यात आलं आणि सगळीकडे पाठवण्यात पण आले. आता निदान पोलिसांकडे एक चेहरा तरी होता जो शोध घेण्यास पुरेसा होता.

एक दिवस अचानक पोलिसांचा फोन आला. फोनवर एका महिलेने मालाडजवळ हा मारेकरी पाहिल्याचे सांगितले व त्याचे वर्णन सांगितले. पोलिसांनी आज त्याला पकडायचंच ही गोष्ट आपल्या मनात बांधली आणि पुन्हा रमणच्या शोधात निघाले.

सिरीयल किलर

तपासात एका पोलिस अधिकाऱ्याला एक माणूस दिसला जो त्या महिलेच्या सांगल्याप्रमाणे त्या हुबेबुब वर्णनासारखा दिसत होता. इतके दिवस ते हीच व्यक्ति शोधत होते हे अधिका-याला उमजले. त्या अधिका-याने सरळ जाऊन रमणला मागून पकडून तुरुंगात नेले.

एवढे दिवस मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचा सदा पाडणारा हा सनकी खुनी अखेर पोलिसांच्या हाती लागला आणि लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. तपासात तो हे खून  का करत होता  याचं उत्तर त्याने कधीही दिले नाही परंतु सर्व खून आपणच केल्याचे  मान्य केल्याने त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.  असं म्हटलं जात की त्याने जवळपास 40च्या वर लोकांचे खून केले होते.

तुरुंगातच शिक्षा भोगत असतांना त्याचा मृत्यू झाला होता.

रमण राघव हे नाव आज अनेकांना परिचित नसेल पण पूर्वी मुंबईतील प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबद्दल माहिती होती. त्या खुनीला सर्वजण विसरले असले तरी अनुराग कश्यपच्या ‘रमन राघव २.०’ या चित्रपटाने पुन्हा एकदा त्या भयानक दृश्याची आठवण करून दिली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here