आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

फॉर्ममध्ये नसलेला मुंबईकर रहाणे या दोन खेळाडूंमुळे आणखीनच अडचणीत आलाय..


टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणेची गणना केली जाते. त्याला संघात स्थान मिळवणे कठीण होत आहे.नेमकचअजिंक्य रहाणेला कसोटी सामन्यातून उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी रोहित शर्माला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

अजिंक्य रहाणे चांगला फलंदाज आहे यात काही शंका नाही, पण गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाही. भारत आणि न्यूझीलंड मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप झाला होता.त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले होते. आता अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळवणे खूप कठीण जाईल असे दिसते.

अजिंक्यचा फॉर्म तर त्याच्यासाठी चिंतेचा विषय बनलायचं शिवाय संघातील दुसऱ्या दोन खेळाडूंमुळे त्याच्या अडचणीत आणखीनच वाढ झालेली आहे.

new google

रहाणे

कारण भारतीय संघाकडे युवा खेळाडूंची मोठी यादी आहे. जे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवत आहे. श्रेयस अय्यर असो वा हनुमा विहारी, त्याच्याकडे रहाणेचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे जर आपण रहाणेबद्दल बोललो तर 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये रहाणेने 21 डावांमध्ये 19.57 च्या सरासरीने केवळ 411 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये केवळ दोन अर्धशतकांचा समावेश आहे. जी एक साधी कामगिरी आहे. कानपूर कसोटीत रहाणेने 35 आणि 4 धावा केल्या त्यानंतर त्याच्यावर टीका होत आहे.

हे फलंदाज घेऊ शकतात अजिंक्य रहाणेची जागा!

श्रेयस अय्यर: श्रेयस अय्यर हा मजबूत फलंदाज आहे. ज्याच्याकडे प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा करण्याची क्षमता आहे. श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये आपल्या धारदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीच्या जागी त्याचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा उचलला.

आपल्या पहिल्याच सामन्यात या फलंदाजाने शानदार शतक झळकावून टीम इंडियात आपली दावेदारी दाखल केली. त्याच्याकडे कसोटी सामने खेळण्याची क्षमताही आहे. श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. ज्याने आपल्या कर्णधारपदाने आणि फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.

आयपीएल 2021 च्या 8 सामन्यात अय्यरने 175 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अय्यरने 54 सामन्यांमध्ये 4592 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर हा एक मजबूत फलंदाज आहे, त्याच्याकडे प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा करण्याची क्षमता आहे, या खेळाडूमध्ये विकेटवर टिकून राहण्याची अद्भुत क्षमता आहे. त्यामुळे निवडकर्त्यांचे लक्ष त्यांच्याकडे जाऊ शकते.

 हनुमा विहारी: भारत अ संघासाठी तीन अर्धशतके झळकावणाऱ्या हनुमा विहारीने निवड समितीचा ताण वाढवलाय.
हनुमा विहारी हा त्याच्या मधल्या फळीत धोकादायक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मधल्या फळीतील त्याची भूमिका समजून घेऊन तो संघाला शेवटपर्यंत नेतो. भारत अ संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामने खेळले गेले जे अनिर्णित राहिले. या दौऱ्यात हनुमा विहारीनी जोरदार पुनरागमनाचे संकेत दिले होते.

एकंदरीत काय तर,रहाणेला संघात कायम रहायचं असेल तर या दोघांपेक्षा सरस कामगिरी करून दाखवावी लागेल अन्यथा मुंबईकर रहाणेला संघाच्या  बाहेर पडायची वेळ लांब नसणारये.


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here