आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

एकदिवसीय सामन्यात 6 विकेट घेण्याचा विक्रम या भारतीय गोलंदाजांनी करून दाखवलाय…


क्रिकेट मॅच लाईव्ह पाहणा-या लोकांसाठी प्रत्येक चेंडू वेगळ्या प्रकारचा थरार घेऊन येतो.भारतात असेही काही खेळाडू होऊन गेले ज्यांनी आपल्या गोलंदाजीने संपूर्ण सामन्याच चित्रच पलटवले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने  ते भारतातील क्रिकेटमध्ये अशा काही खेळाडूंपैकी एक बनले ज्यांनी एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्स घेऊन चालू सामना सहज जिंकला.

आज जाणून घेऊया त्या भारतीय खेळाडूबादल ज्यांनी एका सामन्यात 6 बळी घेऊन सामना सहज जिकला.

अनिल कुंबळे (12/6): 27 नोव्हेंबर 1997 रोजी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात अनिल कुंबळेने नवा विक्रम केला होता. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हजारो क्रिकेटप्रेमींसाठी हा दिवस खूप रोमांचक होता. हा CAB ज्युबिली स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ आमनेसामने होते.

new google

अवघ्या बारा धावांत 6 बळी घेणारा अनिल कुंबळे या सामन्याचा हिरो ठरला. यासह टीम इंडियाने 102 धावांनी मोठा विजय मिळवला आणि कुंबळे ‘मॅन ऑफ द मॅच’ देखील ठरला.

आशिष नेहरा (23/6): 26 फेब्रुवारी 2003 हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विशेष मानले जाते. या दिवशी आशिष नेहराने भारताला मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डर्बन येथे खेळल्या गेलेल्या या विश्वचषकात इंग्लंड आणि भारतीय संघ आमनेसामने होते. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाने मैदानात उतरून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

विकेट

खरे तर नेहराने या सामन्यात अवघ्या 23 धावांत 6 विकेट घेतल्याने इंग्लंडचा संघ पन्नास षटकेही खेळू शकला नाही. त्यांचा संघ 168 धावांवर ऑलआऊट झाला. सामन्यात नेहराला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.

स्टुअर्ट बिन्नी (4/6): 17 जून 2014 रोजी बांगलादेश आणि भारत यांच्यात एक अतिशय रोमांचक किंवा एकतर्फी सामना झाला. या सामन्याने स्टुअर्ट बिन्नीचे नाव क्रिकेटविश्वात चमकले. बांगलादेशची राजधानी ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळला जात होता. जिथे भारत आणि बांगलादेशातील क्रिकेटप्रेमींचा मेळा जमला होता. या सामन्यात स्टुअर्टने केवळ 4 धावा देत 6 बळी घेतले आणि बांगलादेश संघ पूर्ण 18 षटकेही खेळू शकला नाही. विरोधी संघ 58 धावांत ऑलआऊट झाला. यासह टीम इंडियाचा विजय झाला आणि स्टुअर्टची ‘सामनावीर’ म्हणून निवड झाली.

कुलदीप यादव (25/6): 12 जुलै 2018 रोजी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यातून कुलदीप यादवने आपले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या आणि रोहित शर्माच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा हा सामना 8 विकेट्सने जिंकला.

यानंतर कुलदीपने इंग्लंडच्या खेळाडूंना मैदानावर टिकू दिले नाही. ट्रेंटब्रिज मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 25 धावांत सहा गडी बाद केले आणि इंग्लंडला 268 धावांत गुंडाळले.

तर हेच ते खेळाडू ज्यांनी ही मोलाची कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here