आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

विमानाच्या अपघातासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे, नेहमी होत राहतात विमानांचे अपघात…!


भारतात असे अनेक विमानतळ आहेत जेथे फार प्रमाणात विमानांची ये-जा सुरु नसते. तर काही असेही विमानतळ आहेत ज्यावर नेहमीच विमानांची वर्दळ असते. आज आम्ही तुम्हाला अश्या एका विमानतळाबद्दल सांगणार आहोत जे विमानाची ये-जा  करण्यासाठी नाही तर चक्क विमानांचा अपघात होण्यासाठी प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जात कि या विमानतळावर विमानाचे अपघात होतच असतात.

हे आधुनिक काळातील एक विमानतळ आहे,जे नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे.

त्याचे नाव त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ त्याच्या भीषण अपघातांसाठी जगभर प्रसिद्ध झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया हे विमानतळ इतके बदनाम का आहे .

new google

यूएस बांगला विमान अपघात : हे प्रकरण मार्च महिन्यातील आहे. 12 मार्च रोजी, काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर यू-एस बांगला एअरलाइन्सचे विमान कोसळले. या अपघातात विमानातील 71 जणांपैकी 49 जणांचा मृत्यू झाला.

विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वी वैमानिकाला विमानतळावर उतरण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याने काही वेळ थांबावे पण पायलटने त्याचे ऐकले नाही आणि विमान उतरवले. त्यामुळे हा अपघात झाला आणि 49 जणांना आपला जीव गमवावा लागला.

तारा विमान अपघात:  24 फेब्रुवारी 2016 रोजी नेपाळच्या उत्तरेकडील पर्वतीय भागात तारा एअरलाइन्सचे जहाज 20 प्रवासी आणि 3 कर्मचाऱ्यांसह पोखराहून नेपाळमार्गे जोमसोमला जात होते.

मात्र नेपाळच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात जाताना ते अपघाताचा बळी ठरले. या अपघातात जहाजातील सर्व 23 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाशी संबंधित प्राथमिक तपासात असे आढळून आले की अपघाताचे कारण धुके असू शकते.

पाकिस्तान विमान अपघात: 28 सप्टेंबर 1992 रोजी झालेला हा अपघात आजपर्यंतचा सर्वात मोठा हवाई अपघात म्हणून ओळखला जातो. या अपघातात विमानातील 167 जणांपैकी कोणीही वाचले नाही. अपघाताचे कारण म्हणजे मुसळधार पावसात वीज पडणे ज्यामुळे विमानाचे मोठे नुकसान झाले.

या अपघाताबाबत विमानतळ प्राधिकरणाने असे सांगितले की ,मृतांमध्ये 148 प्रवासी, 12 क्रू मेंबर, 4 एअर गार्ड आणि तीन अभियंते होते.

विमानतळ

सीता एअरलाइन्स विमान अपघात : 28 सप्टेंबर 2012 हा दिवसही असा होता की काठमांडूचे त्रिभुवन विमानतळ चर्चेत होते.

विमानजास्त वेळ हवेत राहू शकले नाही आणि मनहरा नदीलगत असलेल्या कोटेश्वर भागात पडले. विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टेक ऑफ केल्यानंतर एखादा पक्षी विमानाच्या इंजिनला धडकला असावा, त्यामुळे त्याला आग लागली. या अपघातात एकुण 16 प्रवासी मारले गेले. मृतांमध्ये 13 भारतीय यात्रेकरू होते.

तुर्की एअरलाइन्सचे विमान अपघात: घटना मार्च 2015 मधील आहे, जेव्हा तुर्की एअरलाइन्सचे फ्लाइट TK 726 त्रिभुवन विमानतळावर उतरत असताना अपघात झाला…फ्लाइट इस्तंबूलहून नेपाळला येत होती. यादरम्यान विमानतळावर उतरत असताना विमान अचानक जमिनीवर घसरले आणि अनियंत्रितपणे कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात 224 प्रवासी होते.

या सर्व अपघातानंतर या विमानतळाची ओळख अपघातांसाठी प्रसिद्ध असलेले विमानतळ म्हणून होऊ लागली..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here