आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

विकी- कतरिनाचं माहिती नाय, पण बॉलीवूडच्या ह्या जोडप्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो खरचं करोडोंमध्ये विकलेत…


नुकतच अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल याचं लग्न राजशाही थाटात पार पडलं. दूरवरून आणलेल्या भाज्या, राजशाही पेहराव ,फक्त काहीच लोकांची उपस्थिती त्यात त्यानाही मोबाईल नेण्यास बंदी या सर्व कारणामुळे मागील काही दिवसापासून हे जोडपे चर्चेचा विषय बनले होते.

त्यात आजुनच एक भर पडली ती म्हणजे त्यांच्या लग्नाच्या फोटो. आता सोशल मिडीयावर असं बोललं जातंय कि कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या फोटो आणि टेलीकास्ट एका कंपनीने तब्बल 80कोटी रुपये देऊन विकत घेतलेत.

आता ही बातमी अधिकृतरित्या ना कतरिना कैफ आणि विकी कौशलने मान्य केलीय ना ज्यांच्या नावावर खपवली जातेय त्या Amazon Primeनेही या वृताला अधिकृत दुजोरा दिला नाहीये.

new google

लग्न

हे झालं विकी आणि कतरिना कैफचं. पण बॉलीवूडमध्ये असेही कपल आहेत ज्यांच्या लग्नाचे फोटो आणि फुटेज खरच  करोडोमध्ये विकल्या गेलेत. त्यातीलच ह्या काही जोड्या.

प्रीती झिंटा- जीन गुडइनफ: बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि जीन गुडइनफ यांचे लग्नही कडेकोट बंदोबस्तात पार पडले. त्यांच्या लग्नाच्या चित्रांनाही चांगला भाव मिळाला. लग्नाचे फोटो विकून कमावलेले पैसे गरीबांच्या कल्याणासाठी दान केले.

प्रियांका चोप्रा- निक जोनास: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने 2018 मध्ये राजस्थानच्या उम्मेद भवनमध्ये अमेरिकन गायक निक जोनाससोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो एका आंतरराष्ट्रीय मासिकाला 18 कोटी रुपयांना विकले गेले.

अनुष्का शर्मा- विराट कोहली: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनेही त्यांच्या लग्नाचे फोटो विकले. त्यांचे लग्न इटलीत झाले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो एका मासिकाला करोडो रुपयांना विकले गेले. हे पैसे त्यांनी गरजू लोकांना दान केले होते.

यामुळे आता कतरिना कैफ आणि विकीचे  फोटो आणि फुटेज खरच 80करोडला विकलेगेले असले तरीही त्यात काही आच्छर्यचकित व्हायची गोष्ट नाहीये..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here